शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

वीज ग्राहकांची ऑनलाईनला पसंती, बिलोपाटी भरले २७.६० कोटी रूपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:18 IST

नांदेड : लघुदाब वर्गवारीतील वीज ग्राहकांना घरबसल्या वीजबिलांचा भरणा करण्याची ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध करून दिल्यानंतर राज्यभरातील ६५ लाख ...

नांदेड : लघुदाब वर्गवारीतील वीज ग्राहकांना घरबसल्या वीजबिलांचा भरणा करण्याची ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध करून दिल्यानंतर राज्यभरातील ६५ लाख वीज ग्राहकांनी दरमहा सरासरी १,४१६ कोटी रुपयांचा ‘ऑनलाईन’ भरणा केला आहे. यामध्ये नांदेड परिमंडळातील १ लाख ४० हजार वीज ग्राहकांनी २७ कोटी ६ लाख रूपयांचा भरणा केला आहे. वेबसाईट व मोबाईल ॲप तसेच अन्य पर्यायांद्वारे ‘ऑनलाईन’ वीजबिल भरणा क्रेडिट कार्ड वगळता निःशुल्क केला आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात गर्दी टाळून घरबसल्या ऑनलाईन वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध आहे.

महावितरणने लघुदाब वीज ग्राहकांना ऑनलाईन बिल भरण्यासाठी वेबसाईट तसेच जून २०१६पासून मोबाईल ॲपद्वारे चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ऑनलाईन भरणा करण्यासाठी नेट बॅंकिंग, क्रेडिट/डेबिट कार्डसह मोबाईल वाॅलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. वीज ग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीज जोडण्यांबाबतही सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे वीजबिल भरणा केंद्रात जाऊन रांगेत उभे राहण्याऐवजी ‘ऑनलाईन’ वीजबिल भरण्याला ग्राहकांनी पसंती दिली आहे.

लघुदाब वीज ग्राहकांना ऑनलाईन बिल भरण्यासाठी दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, युपीआय, भीम, इंटरनेट बॅंकिंग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बॅंकिंगद्वारे वीजबिल भरणा केल्यास वीज देयकामध्ये ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. याआधी नेटबॅंकिंगचा अपवाद वगळता वीजबिलांचा ‘ऑनलाईन’ भरणा करण्यासाठी ५०० रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतु, क्रेडिट कार्ड वगळता नेटबॅंकिंग, डेबिट कार्ड, कॅशकार्ड, युपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ‘ऑनलाईन’द्वारे होणारा वीजबिल भरणा आता निःशुल्क आहे.

‘ऑनलाईन’द्वारे वीजबिल भरणा केल्यानंतर लगेचच ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे पोच देण्यात येत आहे. याशिवाय महावितरणच्या वेबसाईटवर व मोबाईल ॲपवर मागील वर्षभराच्या बिलांचा तपशील व रक्कम भरल्याची पावती उपलब्ध आहे. यासोबतच लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी संबंधित ग्राहकांच्या वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशीलदेखील देण्यात येत आहे.