दोन वर्षापूर्वी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून दत्ता कोकाटे, उमेश मुंढे आणि आनंद बोंढारकर यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. परंतु आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, जिल्हाप्रमुख बदलाच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. पदासाठी इच्छुक असलेले डझनभर नेते त्यासाठी मुंबईत तळ ठोकून आहेत, तर विद्यमान जिल्हाप्रमुखही पदासाठी पुन्हा इच्छुक आहेत. त्यासाठी मुंबईत त्यांनी फिल्डिंग लावली आहे. शिवसेनेतील वजनदार नेता जिल्हाप्रमुख आपल्या गटाचे व्हावेत यासाठी प्रयत्न करीत आहेत, तर नव्याने पक्षात दाखल झालेल्यांना पदे देण्यास कट्टर शिवसैनिकांनी विरोध केला आहे. याअंतर्गत गटबाजीमुळे नांदेड जिल्ह्यातील नियुक्त्या लांबणीवर पडल्या आहेत. शेजारील लातूर आणि बीड जिल्ह्यातील नियुक्त्या मात्र करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नांदेडच्या शिवसैनिकांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
सेनेत गटबाजीमुळे निवडी लांबल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:13 IST