शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

विधानसभा इच्छुकांना इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:17 IST

लोकसभा निवडणुकीत भाजपाने काँग्रेसचा ४० हजारांच्या मताधिक्याने पराभव केला. या निवडणुकीत भोकरसह नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण हे तीन मतदारसंघ पुन्हा काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिल्याचे दिसून आले. दुसरीकडे नायगाव, देगलूरसह मुखेड विधानसभा मतदारसंघाने युतीला साथ दिली आहे.

ठळक मुद्देतीन काँग्रेस तर तीन विधानसभा मतदारसंघ युतीच्या पाठीशी

विशाल सोनटक्के ।नांदेड : लोकसभा निवडणुकीत भाजपाने काँग्रेसचा ४० हजारांच्या मताधिक्याने पराभव केला. या निवडणुकीत भोकरसह नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण हे तीन मतदारसंघ पुन्हा काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिल्याचे दिसून आले. दुसरीकडे नायगाव, देगलूरसह मुखेड विधानसभा मतदारसंघाने युतीला साथ दिली आहे. विधानसभानिहाय निवडणूक आकडेवारी पाहिल्यानंतर या निकालाने विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांनाही एकप्रकारे इशारा दिला आहे.अमिताताई चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघाने काँग्रेसला सुमारे ५ हजार इतके मताधिक्य दिले आहे. येथे प्रताप पाटील यांना ८० हजार २१९ तर अशोक चव्हाण यांना ८५ हजार ५ इतके मतदान झाले आहे. शहरातील नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण हे दोन्ही विधानसभा मतदारसंघही पुन्हा काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिल्याचे दिसून येते. काँग्रेस आ. डी. पी. सावंत यांच्या नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसला सर्वाधिक ३० हजार ११७ इतके मताधिक्य मिळाले आहे. येथे अशोक चव्हाण यांना ९० हजार ५७१ तर प्रताप पाटील चिखलीकर यांना ६० हजार ४५४ इतकी मते मिळाली. शिवसेनेच्या ताब्यात राहिलला नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघही काँग्रेससाठी लाभदायी ठरला. या मतदारसंघातून काँग्रेसला ४ हजार ८६४ इतके मताधिक्य मिळाले. दक्षिणमध्ये अशोक चव्हाण यांना ७७ हजार ३८७ तर प्रताप पाटील चिखलीकर यांना ७२ हजार ५२३ इतकी मते मिळाली. काँग्रेस आ. वसंतराव चव्हाण यांच्या नायगाव विधानसभा मतदारसंघात मात्र काँग्रेसला फटका बसला आहे. काँग्रेसच्या ताब्यातील या मतदारसंघाने युतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांना २० हजार ६६४ इतके मताधिक्य दिले आहे. येथे काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांना ७१ हजार ४३४ मते मिळाली आहेत. तर भाजपाच्या प्रताप पाटील चिखलीकर यांना नायगाव विधानसभा मतदारसंघातून ९२ हजार ७५ मते मिळाली. नायगाव मतदारसंघातील ही आकडेवारी पाहिल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. शिवसेना आ. सुभाष साबणे यांच्या देगलूर विधानसभा मतदारसंघातून प्रताप पाटील चिखलीकर यांना २३ हजार ३०२ मताधिक्य मिळाले आहे. येथे चिखलीकर यांना ८७ हजार २११ मते मिळाली तर अशोक चव्हाण यांना ६३ हजार ९०२ मतांवर समाधान मानावे लागले. भाजपाच्या ताब्यात असलेल्या एकमेव मुखेड विधानसभा मतदारसंघाने चिखलीकर यांना या निवडणुकीत मोठे योगदान दिल्याचे दिसून येते. चिखलीकर यांना तब्बल ३५ हजार ८२७ इतके मताधिक्य या मतदारसंघातून मिळाले आहे. अशोक चव्हाण यांना मुखेडमधून ५३ हजार ८३९ मते मिळाली. तर भाजपाच्या प्रताप पाटील चिखलीकर यांना मुखेड विधानसभा मतदारसंघातून ८९ हजार ६६६ इतकी विक्रमी मते दिली.एकूणच भोकरसह नांदेड शहरातील उत्तर आणि दक्षिण हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसच्या पाठीशी राहिले असले तरी देगलूर आणि मुखेड या युतीच्या ताब्यातील दोन्ही मतदारसंघांनी चिखलीकर यांना भरभरुन मते दिल्याचे स्पष्ट होते. त्यातच काँग्रेसच्या ताब्यातील नायगाव मतदारसंघही चिखलीकर यांच्या पाठीशी राहिल्याने भाजपाच्या विजयाचा मार्ग सोपा झाल्याचे दिसून येते. अवघ्या काही महिन्यानंतर पुन्हा विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक निकालाने विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांनाही एकप्रकारे इशारा दिला आहे. त्यामुळेच आगामी निवडणुका लक्षात घेऊन काँग्रेससह शिवसेना-भाजपालाही नव्याने रणनीती आखावी लागणार आहे.विधानसभेतही राहणार वंचित फॅक्टर

  • वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच आव्हान उभे केले होते. आघाडीचे उमेदवार डॉ. यशपाल भिंगे यांनी १ लाख ६६ हजार १९६ इतकी मते खेचल्याने काँग्रेसचा धक्कादायक पराभव झाला. विधानसभानिहाय वंचित आघाडीला पडलेली मते पाहता भोकर विधानसभा मतदारसंघातून २६,०२०, नांदेड उत्तर मधून ३८,७९५, नांदेड दक्षिण २७ हजार २२२, नायगाव विधानसभा २७ हजार ५३० इतकी मते मिळविली.
  • शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या देगलूर विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीला २६ हजार ३३९ मते मिळाली. तर मुखेड मतदारसंघात १९ हजार ४३५ मतांवर आघाडीला समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, मुखेड तालुक्यातून चांगली मते मिळतील, अशी आघाडीला अपेक्षा होती. त्यामुळेच गोपीचंद पडळकर यांची सभा मुखेडमध्ये घेण्यात आली. मात्र त्यानंतरही या मतदारसंघातून वंचित आघाडीला कमी मते मिळाली.
टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019