शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक शेतीला फारकत देऊन शोभिवंत फुलशेतीतून आर्थिक उन्नतीकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 11:52 IST

यशकथा : विलासराव वामनराव डाखोरे यांनी दीड एकर शेतात नगदी पीक ओळखल्या जाणाऱ्या शोभिवंत फुलशेतीची प्रयोगशील पद्धतीने लागवड करून हजारोंचे उत्पन्न मिळविले आहे.

- प्रा.शरद वाघमारे (मालेगाव, नांदेड)

ग्रामीण भागातील शेतकरी पारंपरिक पिके घेत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे सध्याचे वास्तव चित्र. शासनाचे शेतीविषयक धोरण, निसर्गाची अवकृपा यामुळे पारंपरिक पिकांच्या लागवडीने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. पारंपरिक शेतीला फारकत देऊन मालेगाव शिवारापासून जवळच असलेल्या पळसगाव, ता. वसमत येथील विलासराव वामनराव डाखोरे यांनी दीड एकर शेतात नगदी पीक ओळखल्या जाणाऱ्या शोभिवंत फुलशेतीची प्रयोगशील पद्धतीने लागवड करून हजारोंचे उत्पन्न मिळविले आहे.

डाखोरे यांच्या शेतातील फुलांना सद्य:स्थितीत पुणे, अमरावती, अकोला, जालना आदी विविध जिल्ह्यांतून मागणी असते. भविष्यात अन्य जिल्ह्यांतही फुले जातील, असा विश्वास डाखोरे यांनी व्यक्त केला. डाखोरे यांच्या शेतातून दररोज जवळपास दोन क्ंिवटल फुले बाजारात विक्रीला जात असतात. त्यांनी शेतात फुलशेतीसाठी विशेष कूपनलिका घेतली. जुन्या प्रकारच्या फुलांची लागवड न करता त्यांना विविध लग्न समारंभ व कार्यक्रमासाठी जी शोभिवंत व सुवासिक फुलांची लागवड केली आहे. त्यामध्ये पिवळा, पांढरा, तांबडा, लाल अशा रंगांची फुले आहेत. त्यांच्या शेतातील शिर्डी गुलाबाला बाजारपेठेत मोठी मागणी आहे.

‘डोलिया’ या शोभिवंत गुलाब व पुष्पगुच्छांसाठी लागणारे गवत (अ‍ॅस्पॅरग) याचीही प्रयोगशील पद्धतीने लागवड केली आहे. या फुलशेतीच्या लागवडीसाठी त्यांनी सेंद्रिय पद्धत व ठिबक सिंचनाची पद्धत अवलंबिली आहे. डाखोरे यांच्या फुलशेतीतून वर्षभर ही फुले विक्रीला जातात, हे विशेष!अकोला, जालना, अमरावती आदी जिल्ह्यांतही या फुलांना मोठी मागणी वाढली आहे. फुलशेतीतून डाखोरे यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. याशिवाय गावातील मजुरांनाही चांगला रोजगार फुले तोडण्यामुळे होत आहे.

डाखोरे यांच्या फुलशेतीला दसरा, दिवाळी आदी सणासुदीत चांगली मागणी असते. शेतकऱ्यांनी पारंपरिक पिके न घेता नगदी पिकांकडे वळावे, असे त्यांनी सांगितले. डाखोरे यांनी दीड एकर शेतीत डेकोरेशन फुलांची लागवड करून ती प्रयोगशील पद्धतीने फुलविली आहे़ त्यांनी फुलांची रोपे उन्हाळ्यात पुणे येथून आणली़ उन्हाळ्यात ही फुले स्वस्त दरात येतात असे त्यांनी सांगितले़ जुलै महिन्यात पाऊस चांगला झाल्याने फुलांची लागवड केली़ सप्टेंबरमध्ये फुलांची लागवण सुरू झाली़ या डेकोरेशन फुलात विविधता असल्याने बाजारात त्याला मोठी मागणी आहे़ असे सांगून आंतरपीक पद्धतीने ही फुले लावल्याचे ते म्हणाले़ परिणामी कमी जमिनीत जास्त लागवडीचा प्रयोग त्यांनी यशस्वी केला़ कीड नियंत्रणासाठी गरजेनुसार सेंद्रिय खताचा वापर केला़ ठिबकद्वारे औषधी फुलांना दिली, असेही त्यांनी सांगितले़

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी