शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१४ हजारांवर बालकांना सकस आहार वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:35 IST

गरोदर स्त्रिया, स्तनदा माताना चौकस आहार व सात महिने ते सहा वर्षे वयोगटातील बालके अशा १४ हजार ४७९ बालकांना आहाराचे वाटप करण्यात येत आहे

ठळक मुद्देकिनवट तालुका : एपीजे अब्दुल कलाम अमृत योजनेतंर्गत

किनवट : तालुक्यातील आदिवासी उपयोजना टीएसपीअंतर्गत १२१ गावांत २३३ मोठ्या व १९ मिनी अशा २५० अंगणवाडी केंद्रात डॉ़ एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत गरोदर स्त्रिया, स्तनदा माताना चौकस आहार व सात महिने ते सहा वर्षे वयोगटातील बालके अशा १४ हजार ४७९ बालकांना आहाराचे वाटप करण्यात येत आहे, अशी माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी प्रफुल्ल बागल यांनी दिली़बालक जन्मानंतर पहिले तीन महिने पूर्णपणे मातेवर अवलंबून असल्यामुळे या कालावधीत मातेचे आरोग्य व पोषण चांगले राहणे आवश्यक आहे़ अशा परिस्थितीत त्यांना अतिरिक्त आहार आणि विश्रांतीची गरज असते़ या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने अनुसूचित क्षेत्रातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळ चौरस आहार देण्याची योजना राबविण्यात येत आहे़ त्यानुसार १ हजार २५३ गरोदर स्त्रिया व १ हजार २७८ स्तनदामाता अशा २ हजार ५३१ लाभार्थ्यांना वरणभात, भाजीपोळी, शेंगदाणा लाडू किंवा अंडीे, केळी वाटप करण्यात येत आहे़ याशिवाय ७ महिने ते ६ वर्षेर् वयोगटातील ११ हजार ९४८ बालकांना अंडी किंवा केळी देण्याचे प्रस्तवित असून त्यानुसार हे वाटप करण्यात येत आहे, असे बागल यांनी माहिती देताना सांगितले़कमी वजनाची बालकांचे प्रमाण ३३.१ टक्केअनुसूचित क्षेत्रात आहारातील उष्मांक कॅलरीज व प्रोटिन्सच्या कमतरतेमुळे स्त्रियांमध्ये कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण जास्त असून आदिवासी समाजामध्ये याचे प्रमाण ३३.१ टक्के एवढे आहे़ आदिवासी स्त्रियांमध्ये गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये वजनवाढीचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याचा परिणाम बाळाच्या वजनावर होऊन कमी वजनाची बालके जन्माला येतात, असे अनेक संशोधन व अभ्यासावरून सिद्ध झाले आहे.

टॅग्स :Nandedनांदेडfoodअन्न