शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

नगरपालिकेतील टोकाच्या राजकारणामुळे कंधार शहराच्या विकासाचा वेग खुंटला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 13:47 IST

विकासासाठी प्रत्येक जण आपआपले राजकीय गणित मांडू लागल्याने मोठी कोंडी निर्माण झाली आहे़ त्यामुळे शहराची अवस्था विचित्र होत असल्याचे चित्र आहे़

ठळक मुद्देनगरपालिकेत नळगे गटाकडे नगराध्यक्ष दिले तर आ़ चिखलीकर गटाचे १० नगरसेवक आहेतराज्य शासनाने २०१६ अखेरपर्यंतचा अखर्चिक निधी परत घेण्याची हालचाल सुरू केली आहे

कंधार ( नांदेड ) : शहराचा कायापालट करून सुंदर शहराचे स्वप्न मृगजळ ठरत आहे. आ. प्रताप पा. चिखलीकर व माजी नगराध्यक्ष अरविंद नळगे यांच्यातील टोकाचे राजकारण विकासाचा खेळखंडोबा करणारे ठरत आहे, अशी भावना शहरात पसरल्याने विकासाचा वेग कधी वाढणार, असा सवाल केला जात आहे़

कंधार ऩप़ निवडणूक अतिशय अटीतटीची झाली़ मतदारांनी आ़ प्रताप पाटील चिखलीकर व माजी नगराध्यक्ष अरविंद नळगे यांना नाराज केले नाही़ विकासासाठी सतर्क असणा-या नळगे गटाकडे नगराध्यक्ष दिले़ तर आ. चिखलीकर समर्थक १० जण निवडून दिले़ काँग्रेस विरूद्ध शिवसेना अशी लढत न राहता वैेयक्तिक राजकीय अस्तित्वाच्या लढाईचे स्वरूप या निवडणुकीला आले होते. विकासासाठी प्रत्येक जण आपआपले राजकीय गणित मांडू लागल्याने मोठी कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे शहराची अवस्था विचित्र होत असल्याचे चित्र आहे़

व्यापारी गाळे, महाराणा प्रताप चौक ते शिवाजी चौक रस्ता, मुख्य रस्त्यावरील आठवडी बाजार वाहतुकीची बेशिस्त, पाणीपुरवठा इ. प्रश्नांची उकल करण्यास राजकारण नडत आहे. दोन्ही नेतृत्वाला एकत्रित आणणारा राजकीय दुवा नाही़ जो होता तो एक बाजू धरल्याने तशी शक्यता आता दिसत नाही़ विकास करण्याच्या आश्वासनाने आता नगरसेवकांचे राजकीय भवितव्य टांगणीला लागले आहे. आगामी राजकारणावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची भीती अनेक नगरसेवकांत बळावत चालली आहे. तसेच शहरवासियांना विकासाचे राजकारण असेच होणार का? असा प्रश्न पडला आहे़विकासासाठी निधी मिळत नसल्याची ओरड सातत्याने होत असते़, परंतु निधी असताना विकास साधता येत नसल्यास दोष कोणाचा, हा खरा प्रश्न आहे.

राज्य शासनाने २०१६ अखेरपर्यंतचा अखर्चिक निधी परत घेण्याची हालचाल सुरू केली असताना टोकाचे राजकारण विकासकामाच्या आड येणे, ही शहरवासियांना खटकणारी बाब ठरत आहे़ सर्वांगसुंदर शहर विकास टोकदार राजकारणात अडकला आहे़ आ़प्रताप पाटील चिखलीकरांना मतदारसंघाकडे लक्ष पुरवून २०१९ ची निवडणूक लढवायची आहे़ शहर विकासाचे मॉडेल विधानसभा मतदारसंघात रुजविण्यासाठी उपयोगात आणण्याची गरज आहे. त्यासाठी येथील कार्यकर्त्यांसह प्रमुख पदाधिका-यांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न आ. चिखलीकरांनी करणे गरजेच आहे़ अरविंद  नळगे यांनीही विकासासाठी एक पाऊल मागे घेणे निकडीचे आहे़ अशी राजकीय वर्तुळात चर्चा झडत आहे़ दोन्ही नेत्यांनी एकत्रित न येता टोकाची भूमिका कायम ठेवल्यास आगामी काळात राजकीय किंमत चुकवावी लागण्याचा धोका असून शहर विकासाचा वेगही दिवसेंदिवस कमी होण्याची चिन्हे आहेत. 

व्यापारी गाळे, महाराणा प्रताप चौक ते शिवाजी चौक रस्ता, मुख्य रस्त्यावरील आठवडी बाजार वाहतुकीची बेशिस्त, पाणीपुरवठा आदी प्रश्नांची उकल करण्यास राजकारण नडत आहे़ दोन्ही नेतृत्वाला एकत्रित आणणारा राजकीय दुवा नाही. जो होता तो एक बाजू धरल्याने तशी शक्यता आता दिसत नाही़ विकास करण्याच्या आश्वासनाने आता नगरसेवकांचे राजकीय भवितव्य टांगणीला लागले आहे़ आगामी राजकारणावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची भीती अनेक नगरसेवकांत बळावत चालली आहे़ तसेच शहरवासियांना विकासाचे राजकारण असेच होणार का, असा प्रश्न पडला आहे.