शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बैलगाडी उलटुन झालेल्या अपघातात शेतमजूर ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 18:55 IST

वैरण घेवुन येत असतांना बैलगाडी उलटुन झालेल्या अपघातात एका बत्तीस वर्षीय शेतमजुराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ही घटना हिप्परगा गावालगतच्या पुलाजवळ दि.18 रोजी सोमवारी सायंकाळी सहा वाजेसुमारास घडली.

लोहा (नांदेड ) दि.19 : वैरण घेवुन येत असतांना बैलगाडी उलटुन झालेल्या अपघातात एका बत्तीस वर्षीय शेतमजुराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ही घटना हिप्परगा गावालगतच्या पुलाजवळ दि.18 रोजी सोमवारी सायंकाळी सहा वाजेसुमारास घडली. यात एक जण किरकोळ जखमी झाला आहे.

तालुक्यातील चितळी येथील शेतमजूर अनिल उमाजी जोंधळे (वय 32 ) आणि भारत गायकवाड हे सोमवारी हिप्परगा शिवारातून बैलगाडीत वैरण घेऊन चितळी गावाकडे परत येत होते. हिप्परगा नदीच्या पुलाजवळ येताच अचानक बैल बिथरल्याने   बैलगाडी पलटी झाली.यावेळी भारत याने उडी मारून स्वत:चा जीव वाचवला. मात्र, अनिल यांच्या पायाला अपंगत्व असल्यामुळे त्यांना उडी मारता आली नाही.

काहीच हालचाल करता न आल्यामुळे त्यांच्या अंगावर बैलगाडी अंगावर पडली. दरम्यान, अनिल यांना लोहा येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.त्यांची प्रकृती चिंताजनक नंतर त्यांना नांदेडला हलविण्यात आले. तेथेच उपचारा दरम्यान त्यांचा  मृत्यू झाला. आज त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले,त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली,मुलगा व आई-वडील असा परिवार आहे.अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्याने ते रोजगार करून संसारास हातभार लावत असत.