शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

५०० प्रमाणपत्र वाटप अडगळीला

By admin | Updated: August 6, 2014 02:16 IST

कंधार : महसूल कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.

कंधार : महसूल कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. जात प्रमाणपत्रासह इतर प्रमाणपत्र काढण्यासाठीची प्रक्रिया ऐन भरात आली आहे. परंतु संपामुळे जवळपास ५०० संचिका अडगळीला पडल्याची बाब समोर आली आहे. यात सर्वाधिक फटका मराठा समाजातील विद्यार्थ्यांना बसल्याचे धक्कादायक चित्र आहे.महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना प्रवेश, शिष्यवृत्तीसाठी जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आवश्यक असतो. व्यावसायिक उच्च शिक्षणासाठी अशाच प्रमाणपत्राची आवश्यकता लागते. शासकीय व निमशासकीय सेवेत नोकरीसाठी जातवैधता, रहिवासी पुरावा महत्वपूर्ण मानला जातो. त्यासाठी पालक-विद्यार्थ्यांची आवश्यक प्रमाणपत्रासाठी भक्कम पुरावे जमा करण्यासाठी मोठी घाई चालू आहे. त्यातच मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यामुळे पुरावे जमा करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. त्यातच ‘क’ पत्रक उपलब्ध नसलेली उमरज, शेकापूर, फुलवळ, पेठवडज, पानभोसी, शिराढोण, पानशेवटी, कल्हाळी ८ गावे समोर आली. ‘क’ पत्रक, खासरा ही महसुली पुरावे असल्यास इतर पुरावे त्याला बळकटी देतात. ‘क’ पत्रक नसल्यामुळे निर्गम उताऱ्यांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले. जि.प. शाळात पालकांची वर्दळ सुरू झाली. आवश्यक पुरावे जमा करुन पालक-विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र संचिका सादर केल्या. मराठा समाजाच्या जवळपास ४०० पेक्षा जास्त संचिका दाखल करण्यात आल्या आहेत. इतर प्रवर्गातील पालक- विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र, उत्पन्न, रहिवासी, मिळकतीचे प्रमाणपत्र आदी संचिका दाखल झाल्या आहेत. परंतु गत चार दिवसापासून महसूल कर्मचारी संघटनेचे डी.पी. झगडे, एस.बी. गिते आदीच्या नेतृत्वाखाली कर्मचारी संपावर गेल्याने प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सादर केलेल्या संचिका आता अडगळीला पडल्या. नवीन संचिकाचा ओघ मोठा आहे. परंतु संपामुळे त्या संचिकाचा प्रवास सुद्धा अर्धवट झाला. सेतू सुविधाावरुन संचिका आता हलत नाहीत. त्यामुळे अनेकजण खेटे घालत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. राज्य शासनाने मराठा मुस्लिम समाजाला आरक्षणाचा निर्णय घेतला. आता प्रमाणपत्रासाठी संपाचा मोठा अडसर ठरत आहे. शासनाने तत्काळ संप मिटवावा आणि गैरसोय दूर करण्याची मागणी जनतेतून होत आहे. (वार्ताहर)