शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

शेतकऱ्यांचे अनुदान वाटप करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:14 IST

धनगर समाजाची आरक्षणाची मागणी हदगाव : हदगाव तालुका धनगर आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने समाजाला राजकीय आरक्षण देण्याच्या मागणीचे निवेदन ...

धनगर समाजाची आरक्षणाची मागणी

हदगाव : हदगाव तालुका धनगर आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने समाजाला राजकीय आरक्षण देण्याच्या मागणीचे निवेदन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. बी. के. इंगळे, गजानन सुकापुरे, श्रीनिवास हुलकाने, प्रभाकर डुरके, ओम लकडे, मारोती तासके, ओंकार हंडेवार, संदीप आरळे, अशोकराव हिंगाडे, गजानन हुलकाने आदी उपस्थित होते.

अर्जापुरात विजेचा लपंडाव

बिलोली : तालुक्यातील अर्जापूर येथे गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्यामुळे ग्रामस्थ वैतागले आहेत. वादळ, वारा असो की नसो, वीज मात्र गायब होते. एकदा वीज गेली की, जवळपास पाच तास येत नाही. संबंधीत अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

मुख्याध्यापक खांडरे यांचे स्वागत

उमरी : तळेगाव संकुलातील बळेगाव जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकपदी भगवान खांडरे रूजू झाले. याबद्दल त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी एस. एल. बेळकोणे, केंद्रप्रमुख एस. के. मुक्कावार, शिक्षक नंदकिशोर परळीकर, विलास कोळनूरकर आदी उपस्थित होते.

तीन ग्रामसेवकांच्या बदल्या

सगरोळी : सगरोळी येथील तीन ग्रामसेवकांच्या मागील पाच महिन्यात बदल्या झाल्या आहेत. सत्ताधारी आणि विरोधकातील कुरघोडीमुळे ग्रामसेवक टिकत नसल्याचा आरोप आहे. यामुळे गावच्या विकासावर परिणाम होत आहे. एम. एस. मुगावे, बी. एच. धोतरे, डी. हंबीरे या ग्रामसेवकांच्या पाच महिन्यात बदल्या झाल्या आहेत.

नाईक यांचे नाव द्या

देगलूर : हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याची मागणी गोर सेनेच्या वतीने करण्यात आली. निवेदनावर तालुकाध्यक्ष विशाल पवार, सर्कलप्रमुख सतीश चव्हाण, सौरभ राठोड, गोपाळ चव्हाण, शेख असलम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

प्रा. शेख सेवानिवृत्त

लोहा : संत गाडगे महाराज ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक शेख शहाबुद्दीन निजामोद्दीन प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. त्यांना एका कार्यक्रमात ३० जून रोजी निरोप देण्यात आला. कार्यक्रमाला मुख्याध्यापक डी. एस. बोधगिरे, उपमुख्याध्यापक प्रा. प्रदीप पानपट्टे, उपप्राचार्य अमरसिंह दापके, बी. डी. जाधव, बी. आर. पवार, पर्यवेक्षक सूर्यवंशी उपस्थित होते.

शेतकरी संघटनेची बैठक

नांदेड : शेतकरी संघटनेची महत्त्वाची बैठक गुरुवार, १ जुलै रोजी दुपारी नवा मोंढा येथे होणार आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख शिवाजीराव शिंदे यांनी दिली. बैठकीला ज्येष्ठ नेते गुणवंत पाटील हंगरगेकर, ॲड. धोंडिबा पवार, जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे मार्गदर्शन करणार आहेत.

येरगी येथे मास्क वाटप

देगलूर : येरगी येथील आरोग्य केंद्रात मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी युुवा सेनेचे लखन साबळे, संतोष पाटील, सचिन पाटील, रज्जाक धुंदी, बालाजी तलावार, किरण ठाकरे, लांडगे मॅडम, राधाबाई, विश्वनाथ बागेवार, पुंडलिक वाघमारे, राजू सोमवार, अभिजीत बरसमवार, मारोती रेड्डी आदी उपस्थित होते.

कोळपणीचे काम सुरू

हिमायतनगर : तालुक्यात दमदार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी कोळपणीचे काम सुरू केले आहे. कोळपणी करून पिकातील तण काढण्याचेही काम केले जात आहे. यावर्षी या भागात सोयाबीनचा पेरा जास्त प्रमाणात झाला आहे.

केशव पाटील यांची निवड

नायगाव : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका सचिवपदी केशव पाटील मोकासदरेकर यांची निवड झाली. तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांनी ही नियुक्ती केली. सरचिटणीस राजेश पाटील, प्रवीण दुगडुमवार, संघटक विलास जाधव, सहसंघटक जनार्दन पाटील यांचा समावेश आहे.

आरक्षण पुढे ढकलले

भोकर : तालुक्यातील दहा गावचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आले होते. तेथील जागा रिक्त असल्याने पुन्हा आरक्षण सोडत २८ रोजी काढण्यात येणार होती. मात्र, ती सोडत पुढे ढकलण्यात आली. यामध्ये रेणापूर, जाकापूर, धारजनी, धावरी, रावणगाव, दिवशी खु., हस्सापूर, सायाळ, किनाळा, बटाळा, कोळगाव खु. आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

रस्त्याची दुरवस्था

मुक्रमाबाद : रावी - मुक्रमाबाद - इटग्याळ मार्गावर मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाली. पावसाने रस्त्याला डबक्याचे स्वरूप आले आहे. यातून मार्ग काढताना प्रवासी वाहनधारकांना कसरत करावी लागत असून अपघातांना सामोरे जावे लागत आहे.

जयंत पाटील यांचा सत्कार

माहूर : आ. भीमराव केराम यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा माहूर दौऱ्यावर असताना सत्कार केला. यावेळी रखडलेला उनकेश्वर प्रकल्प पूर्ण करावा, लघुसिंचन तलावाच्या कालव्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी केराम यांनी पाटील यांच्याकडे केली.

महिलांचे धरणे

भोकर : राज्य रोहयोअंतर्गत मजुरांना नोंदणी पुस्तक देण्यात यावे, या मागणीसाठी भोकर नगर परिषद कार्यालयासमोर महिला कामगारांनी २९ जून रोजी एक दिवसाचे धरणे आंदोलन धरणे. सीटूच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात कामगार संघटनेचे जिल्हा सरचिटणीस दिलीप धोतरे, शिवाजी गायकवाड यांच्यासह महिलांची उपस्थिती होती.

रक्तदान शिबिर उत्साहात

अर्धापूर : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वराज्य मित्रमंडळाच्या वतीने शेणी येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात २५ जणांनी रक्तदान केले. कार्यक्रमासाठी अनेकांनी परिश्रम घेतले आहे.

१८८ झाडांचे वृक्षारोपण

नायगाव : जागतिक वृक्षारोपण दिनानिमित्त बार्टी समतादूत प्रकल्पाच्या वतीने नायगाव तालुक्यात १८८ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाला नायगाव तालुका समतादूत दिलीप सोंडारे व अन्य उपस्थित होते. नायगाव, होटाळा, धुप्पा, देगाव, पळसगाव, खैरगाव, उंचेली, हिप्परगा, किनाळा, नरसी, जिगळा, शंकरनगर, दत्तनगर, कांडाळा, गडगा आदी ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

गफार यांची नियुक्ती

हिमायतनगर : कार्ला येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. अ. अब्दुल गफार यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच गजानन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ठराव घेऊन समिती गठीत करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून संजय गोखले, सदस्य शिवाजी एटलेवाड, गौतम कांबळे, अंगद सुरोशे, दत्ता चिंतलवाड, विश्वास घोडके, मारोती ठमके आदींची निवड झाली.