शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रिंगणातील १६६ पैकी १४५ उमेदवारांचे झाले डिपॉझिट जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:10 IST

देशातील सर्वोच्च निवडणूक असलेल्या लोकसभा निवडणूक लढवून संसदेत जाण्यासाठी अनेकजण इच्छुक असतात. यासाठी ते प्रयत्नही करतात.

अनुराग पोवळे।नांदेड : देशातील सर्वोच्च निवडणूक असलेल्या लोकसभा निवडणूक लढवून संसदेत जाण्यासाठी अनेकजण इच्छुक असतात. यासाठी ते प्रयत्नही करतात. मात्र प्रत्यक्षात आपल्याला किती मतदान होते, याचा अदमास न आल्याने या उमेदवारांना आपले डिपॉझिटही वाचविता येत नाही. नांदेड लोकसभेच्या आतापर्यंत झालेल्या निवडणुकांत १६६ उमेदवारांनी निवडणूक लढविली आहे. त्यातील १४५ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.नांदेड लोकसभेची १९५१ मध्ये पहिली निवडणूक झाली. या निवडणुकीत रिंगणात उतरलेल्या उमेदवारांपैकी ४ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. १९५७ च्या निवडणुकीत ४ उमेदवार रिंगणात होते. विशेष म्हणजे, या निवडणुकीत चारही उमेदवारांचे डिपॉझिट अबाधित राहिले होते.एकूण मतदानाच्या १६ टक्क्यांहून अधिक मते मिळाली. १९७७ च्या निवडणुकीत नांदेड मतदारसंघात केवळ दोनच उमेदवार रिंगणात होते. सर्वाधिक २१ उमेदवारांचे डिपॉझिट १९९६ मध्ये झालेल्या निवडणुकीत जप्त झाले होते. या निवडणुकीत ४ उमेदवार रिंगणात होते. २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीतही अशीच परिस्थिती राहिली. प्रत्येकी २० उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. २००९ मध्ये २२ तर २०१४ मध्ये २४ उमेदवार रिंगणात होते. २०१९ च्या निवडणुकीत १४ उमेदवार रिंगणात आहेत़डिपॉझिट जप्त होऊ नये म्हणून किती लागतात मते?एखाद्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणार की नाही हे त्याला मिळालेली मते आणि एकूण वैध मते यांच्या प्रमाणावर अवलंबून असते. कोणत्याही उमेदवाराला एकूण वैध मतांच्या किमान १६ टक्के मते मिळवावी लागतात. तेवढी मिळाली नाही तर त्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडNandedनांदेडlok sabhaलोकसभा