शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

आंदोलक शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ नांदेडमध्ये धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:14 IST

नांदेड : केंद्राच्या कृषी धोरणाविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी संत बाबा बलविंदरसिंघजी यांच्या प्रमुख ...

नांदेड : केंद्राच्या कृषी धोरणाविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी संत बाबा बलविंदरसिंघजी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी नांदेड येथेही धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, दिल्लीतील आंदोलनाला गुरुद्वारा सचखंड बोर्डानेही पाठिंबा जाहीर केला असून, दिल्लीच्या लंगरसाठी मंगळवारी गुरुद्वारा बोर्डाची ५० जणांची टीम दिल्लीला रवाना होणार आहे. समूह हजुरी साथ संगत श्री हुजूर साहिब नांदेड व जिल्ह्यातील नागरिक शेतकऱ्यांच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. नांदेडची धरती ही श्री. गुरुगोविंदसिंघजी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. या भूमीतून दिल्लीतील आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत असल्याचे सांगत केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून देशात समृद्धी व स्थिरता आणावी, असे आवाहन संत बाबा बलविंदरसिंघजी यांनी यावेळी केले. आंदोलनाच्या प्रारंभी गुरुद्वारामध्ये अरदास करण्यात आली. त्यानंतर शीख बांधवांसह शेतकरी, नागरिकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. तेथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सत नाम वाहे गुरुंचा पाठ करून शबद गायन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महापौर मोहिनी येवनकर, सुखविंदरसिंघ हुंदल, राजेंद्रसिंघ पुजारी, बोर्डाचे सदस्य गुरमीतसिंघ महाजन, मनप्रीतसिंघ कुंजीवाले, विरेंद्रसिंघ गाडीवाले, गुरमितसिंघ नवाब, भागेंदरसिंघ घडीसाज, रविंद्रसिंघ मोदी, अवतारसिंघ पहरेदार, सुरेंद्रसिंघ, प्रकाशकौर खालसा आदींची उपस्थिती होती.

चौकट.......

गुुरुद्वारा बोर्ड दिल्ली येथे सुरू करणार लंगर

केंद्राच्या शेतकरी कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला गुरुद्वारा सचखंड बोर्डाने पाठिंबा जाहीर केला असून दिल्लीच्या सिंधू बॉर्डरवर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसाठी लंगरची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी लंगर सामग्री घेऊन ५० जणांची टीम मंगळवारी बोर्डाचे सचिव स. रविंद्रसिंघजी बुंगई यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीकडे रवाना होणार आहे.

फोटो कॅप्शन - केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात सोमवारी संत बाबा बलविंदरिसंघजी यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शीख बांधवांसह शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येेने सहभागी झाले होते.

फोटो नं.०७एनपीएचडीईसी०३.जेपीजी