शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

पदवी परीक्षा उरली नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:51 PM

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने सुरू केलेल्या होम परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्याच महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर परीक्षण करण्यात येत असल्याने आणि प्राध्यापकही तेच असल्याचे परीक्षार्थीमध्ये कुठलीही भीती राहिली नसल्याचे चित्र आहे़

भारत दाढेल।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने सुरू केलेल्या होम परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्याच महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर परीक्षण करण्यात येत असल्याने आणि प्राध्यापकही तेच असल्याचे परीक्षार्थीमध्ये कुठलीही भीती राहिली नसल्याचे चित्र आहे़स्वारातीम विद्यापीठाने स्थापनेपासून अभ्यासक्रम, परीक्षा पद्धतीत वेगळा आकृतिबंध निर्माण करून नवा पॅटर्न निर्माण केला होता़ परंतु सद्य:स्थितीतील विद्यापीठाचा पदवीचा अभ्यासक्रम परीक्षा पद्धतीमुळे घसरत चालला आहे़ सीबीसीएस अभ्यासक्रम, सत्र परीक्षा, होम परीक्षा यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा बट्ट्याबोळ झाला आहे़ महाविद्यालयात झालेल्या परीक्षेचे पेपर मूल्याकंन, फेरतपासणी त्याच प्राध्यापकांनी करायची हा नवा नियम विद्यापीठाने लागू केला आहे़ पदवी परीक्षेतील केंद्रावर बहि:स्थ पर्यवेक्षक, भरारी पथक नसल्याने होम परीक्षेत सर्वत्र कॉप्यांचा सुळसुळाट सुरू आहे़ आपल्याच विद्यार्थ्यांवर कॉपीची कारवाई करण्यास महाविद्यालय प्रशासन पुढे येत नाही़विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर तत्कालीन कुलगुरू डॉ़ जनार्दन वाघमारे यांनी अभ्यासक्रम, परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल केले होते़ विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालयात कॉपीमुक्तीचा नवा पॅटर्न तयार झाला होता़ परीक्षार्थ्याने कॉपी करून नये म्हणून डब्ल्यूपीसी, एसपीसी, निकाल राखून ठेवणे यासारखे नवीन नियम लागू केले होते़ त्यामुळे कॉपीवर मोठ्या प्रमाणात आळा बसला होता़परंतु आता या विद्यापीठाने पदवी परीक्षेत सत्र परीक्षा लागू केली़ त्यानंतर चॉईस बसे क्रेटीट सिस्टिम लागू केली़ यामध्ये विद्यार्थ्यांना बहुपर्यायी प्रश्न, अंतर्गत गुण लागू केल्याने नापास होण्याची भीती कमी झाली़ गत दोन वर्षांपासून होम परीक्षा सुरू करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत शंका निर्माण केली आहे़ परीक्षा महाविद्यालयात घेण्यात येत असून परीक्षा केंद्रावर परीक्षण करणारे प्राध्यापकही तेच असल्याने परीक्षार्थ्यांना कोणतीच भीती राहिली नाही़ परीक्षेसाठी बहि:स्थ पर्यवेक्षक म्हणून नेमणुका यावर्षी विद्यापीठाने बंद केल्यामुळे कॉपीसाठी रान मोकळे करून दिले आहे़ परीक्षा आपल्याच महाविद्यालयात देवून पेपर तपासणीही तेच प्राध्यापक करणार असल्याने परीक्षक आपल्या विद्यार्थ्यांना हात सोडून गुणदान देवून महाविद्यालयाचा निकाल चांगला लावण्याचा प्रयत्न करीत आहेत़ विद्यापीठाने मॉडरेशन ही त्याच महाविद्यालयातील प्राध्यापकाने करण्याचा नियम काढला आहे़