शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या धक्क्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:14 IST

उपाध्यक्षपदी पाटील बिलोली -बिलोली तालुक्यातील शैलेष पाटील चिंचाळकर यांची भाजयुमोच्या जिल्हा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. यावेळी खा.प्रताप पाटील चिखलीकर, ...

उपाध्यक्षपदी पाटील

बिलोली -बिलोली तालुक्यातील शैलेष पाटील चिंचाळकर यांची भाजयुमोच्या जिल्हा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. यावेळी खा.प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, गंगाधरराव जोशी, लक्ष्मणराव ठक्करवाड, श्रावण पाटील, डॉ.माधव उच्चेकर, रवी पाटील आदी उपस्थित होते.

आर्थिक मदत द्या

धर्माबाद - तालुक्यातील मौजे जारीकोट येथील भोई समाजाच्या गौराबाई कन्नेवाड यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. तिच्या कुटुंबियांना गोपीनाथ मुंडे विमा योजनेचा लाभ देण्याची मागणी होत आहे.शेतात काम करत असताना गौराबाई यांना सर्पाने दंश केला होता. या संदर्भात भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र पोतगंठीवार यांनी संबंधितांचे लक्ष वेधले.

पणन महासंघाचे आवाहन

भोकर - पणन महासंघाच्या वतीने भोकर व हदगाव येथील कापूस खरेदी केंद्रावर कापूस खरेदी सुरू आहे. कापूस खरेदी केंद्रावर आणताना शेतकऱ्यांनी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोंदणी करून मोबाईल संदेश प्राप्त झाल्यानंतर कापूस विक्रीसाठी केंद्रावर आणावा, जोपर्यंत एफएक्यू दर्जाचा कापूस शिल्लक आहे तो कापूस पणन महासंघ खरेदी करणार आहे.

विद्युत तारा धोकादायक

हदगाव - तालुक्यातील बरडशेवाळा येथील विद्युत तारा धोकादायक बनल्या आहेत. गावातील तारा जुन्या असल्याने एकमेकांना स्पर्श होवून जाळ होण्याचे प्रकार वाढले आहेत. संबंधितांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

गेंटलवार यांची निवड

माहूर - तालुका सीडस् पेस्टीसाईज आणि फर्टीलायझर्स संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी वाईबाजार येथील अशोक गेंटलवार यांची निवड झाली. यावेळी प्रदीप गावंडे, अतुल पाटील, मधुकर बेहरे, संदीप राठोड, कुंदन राठोड, अर्जुन जाधव, जीवन अग्रवाल, सलीम खाकरा, विनायक काण्णव, श्याम पाटील, सुरज कंधारकर, रुपेश जाधव, संजय चव्हाण, प्रणीत बनगीरवार, प्रकाश येरावार आदी उपस्थित होते.

मांस विक्रीची दुकाने हलवा

निवघा बाजार - येथील रस्त्यालगत असलेले मांस विक्रीची दुकाने हटविण्यात यावी अशी मागणी विनायकराव कदम व इतरांनी केली. दुकानाला लागूनच धार्मिक स्थळ आहेत, मोठी वस्ती आहे. दुकानदाराने ग्रामपंचायतचे कोणतेही नाहरकत प्रमाणपत्र घेतले नाही.

तुरीचे पीक वाळले

मुक्रमाबाद - मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद परिसरात तुरीचे पीक वाळून गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे. परिसरातील शेतकरी सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी आदी पिकात तूर घालतात. तुरीचा फायदा होतो. मात्र तुरीवरच संकट आल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

नवीन शाखाधिकारी

हदगाव - जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बरडशेवाळा शाखेला नवीन शाखाधिकारी व रोखपाल मिळाले असून त्यांनी आपला पदभार स्वीकारला आहे. यापूर्वीचे शाखाधिकारी डी.आर.गायकवाड यांची सारखणी येेथे बदली झाली होती. त्यांच्या जागेवर पी.टी. पावडे यांनी पदभार स्वीकारला आहे. तर एस.जी.बाबळे हे रोखपाल म्हणून रूजू झाले आहेत.

चुरशीच्या लढतीची अपेक्षा

देगलूर - तालुक्यातील ८५ ग्रामपंचायतीसाठी ७२५सदस्य निवडले जाणार आहेत. यात ३६३महिला व ३६२पुरुषांचा समावेश आहे. मरखेल, करडखेड, खानापूर, हणेगाव, लोणी, शहापूर, तडखेल, माळेगाव या ग्रामपंचायतीच्या निवडणुकी चुरशीच्या होण्याची अपेक्षा आहे.