शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आरोपी हिमाचल पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 23:53 IST

पंधरा लाख रुपयांत ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन देतो असे आमिष दाखविणाºया आरोपी सचिन राठोड याला शुक्रवारी सायंकाळी हिमाचल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: पंधरा लाख रुपयांत ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन देतो असे आमिष दाखविणाºया आरोपी सचिन राठोड याला शुक्रवारी सायंकाळी हिमाचल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़ अधिक चौकशीसाठी ते सचिन राठोड याला शनिवारी हिमाचलला घेवून जाणार आहेत़ दरम्यान, या प्रकरणात नांदेड पोलिसांनी आरोपीवर आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंदविला आहे़पंधरा लाख रुपयांत ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन देण्याचे आमिष दाखविणाºया आरोपी सचिन राठोड याला नांदेड पोलिसांनी अटक केली होती़ सचिन राठोड याने नांदेड महापालिकेत जवळपास ३० उमेदवारांना मेसेज पाठविले होते़ त्यानंतर झालेल्या हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीतही तेथील अनेक उमेदवारांना मेसेज पाठवून काही जणांशी संपर्कही साधला होता़ या प्रकरणात आरोपी सचिन राठोड याच्याविरोधात शिमला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ नांदेड पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर आरोपी सचिन याने संपर्क साधलेल्या काही उमेदवारांचीही चौकशी करण्यात आली़त्यासाठी नांदेड पोलीस महापालिकेतही पोहोचले होते़ दरम्यान, आरोपी सचिन राठोड याने उमेदवारांशी संपर्क साधण्यासाठी वापरलेले सीम हे त्याने इस्लापूर येथील एका मच्छीमाराचे चोरले असल्याचे उघडकीस आले़ त्यानंतर त्याला इस्लापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते़ त्या ठिकाणी त्याच्यावर चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला़ या प्रकरणात न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती़ शुक्रवारी त्याची कोठडी संपल्यानंतर त्याला हिमाचल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले़शनिवारी त्याला तपासासाठी हिमाचलला नेण्यात येणार आहे़ दरम्यान, आरोपी सचिन राठोड याला ईव्हीएमबाबत बरेचसे ज्ञान असून त्याच्यावर आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंदविला असल्याची माहिती स्थागुशाचे पोनि़ संदीप गुरमे यांनी दिली़