शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

‘सीआरपीएफ’मुळेच देशाची अंतर्गत सुरक्षा मजबूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:19 IST

कॅप्शन : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीआरपीएफ कॅम्प मुदखेड येथे १ काेटीव्या वृक्षाचे राेपण करताना साेबत जवानांना मार्गदर्शन करताना. ...

कॅप्शन : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीआरपीएफ कॅम्प मुदखेड येथे १ काेटीव्या वृक्षाचे राेपण करताना साेबत जवानांना मार्गदर्शन करताना.

नांदेड : देशातील एकूणच वातावरण पाहता केंद्रीय राखीव पाेलीस दलाच्या जवानांशिवाय अंतर्गत सुरक्षा मजबूत राहू शकत नाही, किंबहुना तशी कल्पनाही केली जाऊ शकत नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. ते शुक्रवारी नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे सीआरपीएफ कॅम्पमध्ये आयाेजित ‘अखिल भारतीय वृक्षाराेपण अभियान-२०२१’ या कार्यक्रमात जवानांना मार्गदर्शन करताना बाेलत हाेते. सीआरपीएफच्या मुदखेड कॅम्पमध्ये अमित शहा यांच्या हस्ते एक कराेडव्या वृक्षाचे राेपण शुक्रवारी दुपारी करण्यात आले. यावेळी शहा म्हणाले, देशांतर्गत सुरक्षेचा काेणताही प्रश्न निर्माण झाला की, सर्वप्रथम आठवण येते ती सीआरपीएफ जवानांची. हे जवान काेणतेही आव्हान स्वीकारण्यास, बलिदान देण्यास कायम तत्पर असतात. ही कुणाला अतिशयाेक्ती वाटेल, परंतु सीआरपीएफ जवानांशिवाय देशाच्या अंतर्गत सुरक्षेची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. गेल्या सात वर्षांत सीआरपीएफच्या २ हजारपेक्षा अधिक जवानांनी प्राणांची आहुती दिली. त्यामुळेच आज देश सुरक्षित असल्याचे शहा यांनी सांगितले.

शहा म्हणाले, केंद्रीय सुरक्षा बलाने २ काेटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला. दाेन वर्षांपासून हा कार्यक्रम राबवला जात आहे. यावर्षी ९९ लाख ९९ हजार ९९९ रोपांची लागवड करण्यात आली असून, १ काेटीव्या क्रमांकाचे रोप मी मुदखेड येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये लावताेय, ही माझ्या आनंदाची व गाैरवाची बाब आहे. १७ सप्टेंबर हा पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा वाढदिवस, निजामाच्या जुलमी शासनातून मराठवाडा व तेलंगणाची मुक्तता झाल्याचा सुवर्ण दिवस व गुरू गाेविंदसिघांची पावन भूमी. त्यामुळेच मी नांदेड जिल्ह्याची १ काेटीव्या वृक्ष लागवडीसाठी निवड केल्याचे शहा यांनी सांगितले. या कार्यक्रमाला नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर, सीआरपीएफचे महासंचालक कुलदीपसिंग हे प्रामुख्याने उपस्थित हाेते. यावेळी अमित शहा यांचा गुरूद्वाराचे स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

चाैकट....

शहिदांचे बलिदान देश विसरणार नाही

१७ सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती दिन आहे. निजामांच्या जुलमी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ, गाेविंदभाई श्राफ, दिगांबर पाटील आदींनी दिलेले बलिदान देश कधीही विसरू शकणार नाही, असे सांगत सुरक्षा दलाकडून मराठवाडा मुक्ती संग्रामातील सर्व शहिदांना अमित शहा यांनी श्रद्धांजली अर्पण केली. देशाचे पहिले गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी हे ऑपरेशन यशस्वी करून देशाच्या स्वातंत्र्यानतर १३ महिन्यांनी मराठवाड्याला निजामांपासून मुक्तता मिळवून दिल्याचे स्मरणही अमित शहा यांनी यावेळी करून दिले.

चाैकट....

देश ५ ट्रिलियन डाॅलरच्या वाटेवर

अमित शहा यांनी सांगितले की, भारत देश ५ ट्रिलियन डाॅलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. त्यात सुरक्षा दलातील जवानांचे याेगदान तेवढेच माेठे आहे. त्यांच्याशिवाय ही वाटचाल शक्य नाही.