शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
3
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
4
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
7
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
8
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
9
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
10
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
11
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
12
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
13
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
14
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
15
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
16
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
17
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
18
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
19
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
20
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश

जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:13 IST

जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र हे ७ लाख ४२ हजार ८६१ इतके आहे. त्यापैकी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ६ लाख ५४ ...

जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र हे ७ लाख ४२ हजार ८६१ इतके आहे. त्यापैकी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ६ लाख ५४ हजार १३४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. देगलूर तालुक्यात १०१.२७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. हिमायतनगर तालुक्यात ९९.११, माहृर ९५.७८, लोहा ९७.६२, नांदेड- ८२.२७, अर्धापूर ९४.९४, मुदखेड- ९६.९३, कंधार- ९९.९४, मुखेड ७७.१०, नायगाव ७०.२६, बिलोली ७१.४४, धर्माबाद ९२.८६, किनवट ८८.२२, हदगाव ९२.८९, भोकर ८६.९२ आणि उमरी तालुक्यात ७८.२२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक पेरणी ही सोयाबीन या नगदी पिकाची झाली आहे. खरीप हंगामात सोयाबीनचे ३ लाख ९ हजार ७७५ हेक्टर क्षेत्र अपेक्षित असताना ३ लाख ६८ हजार ३४ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ११८.९६ टक्के सोयाबीनची पेरणी केली आहे. तूर पिकाचा पेराही चांगला झाला आहे. ९१.४१ टक्के पेरणी पूर पिकाची झाली आहे. ज्वारी पीक १८ हजार ८५५, मूग १८ हजार ७१२, उडीद १९ हजार २८७ आणि १ लाख ७२ हजार २७३ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात पावसाअभावी पिके माना टाकू लागली होती. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते. अनेक भागात शेतकरी पिके जगवण्यासाठी प्रयत्न करीत होते. बुधवारी दुपारी काही भागात चांगला पाऊस झाला. संध्याकाळी मात्र जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने चांगली हजेरी लावली. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत यात सर्वाधिक पाऊस भोकर तालुक्यात झाला आहे. येथे ५९.० मिमी. पावसाची नोंद झाली. किनवट तालुक्यात ५७.६०, उमरी ५६.३, नायगाव ५२.४, नांदेड २३.५, बिलोली ४२.३, मुखेड २७.९, कंधार २०.३, लोहा २३.५, हदगाव ३८.८, देगलूर ३३.६, मुदखेड ३६.६, हिमायतनगर २८, माहूर २१.४, धर्माबाद ४५ मिमी. आणि अर्धापूर तालुक्यात २६.६ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण ३६.२ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. जूनमध्ये १४४.९ मिमी. पाऊस अपेक्षित असताना २२५.१ मिमी. तर जुलैमध्ये ७६ मिमी. पाऊस अपेक्षित असताना ४७.९ मिमी. पाऊस झाला आहे. जुलैमध्ये पावसाने ताण दिल्याने शेतकरी चिंतीत झाला होता. मात्र बुधवारी चांगला पाऊस झाल्याने आता शेतकरी सुखावला आहे. त्याचवेळी जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटही उद्‌भवले होते ते आता दूर झाले आहे. उर्वरित १२ टक्के पेरण्याही या पावसाने पूर्ण होतील, असे जिल्हा कृषी अधीक्षक आर.बी. चलवदे यांनी सांगितले.नांदेड- जिल्ह्यात बुधवारी रात्री झालेल्या चांगल्या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट टळले असून जिल्ह्यात ८८ टक्के पेरण्या झाल्या असून उर्वरित पेरण्याही दोन दिवसात पूर्ण होतील, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. त्याचवेळी या पावसाने पेरणी झालेली पिकेही बहरली आहे.

जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र हे ७ लाख ४२ हजार ८६१ इतके आहे. त्यापैकी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ६ लाख ५४ हजार १३४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. देगलूर तालुक्यात १०१.२७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. हिमायतनगर तालुक्यात ९९.११, माहृर ९५.७८, लोहा ९७.६२, नांदेड- ८२.२७, अर्धापूर ९४.९४, मुदखेड- ९६.९३, कंधार- ९९.९४, मुखेड ७७.१०, नायगाव ७०.२६, बिलोली ७१.४४, धर्माबाद ९२.८६, किनवट ८८.२२, हदगाव ९२.८९, भोकर ८६.९२ आणि उमरी तालुक्यात ७८.२२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक पेरणी ही सोयाबीन या नगदी पिकाची झाली आहे. खरीप हंगामात सोयाबीनचे ३ लाख ९ हजार ७७५ हेक्टर क्षेत्र अपेक्षित असताना ३ लाख ६८ हजार ३४ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ११८.९६ टक्के सोयाबीनची पेरणी केली आहे. तूर पिकाचा पेराही चांगला झाला आहे. ९१.४१ टक्के पेरणी पूर पिकाची झाली आहे. ज्वारी पीक १८ हजार ८५५, मूग १८ हजार ७१२, उडीद १९ हजार २८७ आणि १ लाख ७२ हजार २७३ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात पावसाअभावी पिके माना टाकू लागली होती. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते. अनेक भागात शेतकरी पिके जगवण्यासाठी प्रयत्न करीत होते. बुधवारी दुपारी काही भागात चांगला पाऊस झाला. संध्याकाळी मात्र जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने चांगली हजेरी लावली. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत यात सर्वाधिक पाऊस भोकर तालुक्यात झाला आहे. येथे ५९.० मिमी. पावसाची नोंद झाली. किनवट तालुक्यात ५७.६०, उमरी ५६.३, नायगाव ५२.४, नांदेड २३.५, बिलोली ४२.३, मुखेड २७.९, कंधार २०.३, लोहा २३.५, हदगाव ३८.८, देगलूर ३३.६, मुदखेड ३६.६, हिमायतनगर २८, माहूर २१.४, धर्माबाद ४५ मिमी. आणि अर्धापूर तालुक्यात २६.६ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण ३६.२ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. जूनमध्ये १४४.९ मिमी. पाऊस अपेक्षित असताना २२५.१ मिमी. तर जुलैमध्ये ७६ मिमी. पाऊस अपेक्षित असताना ४७.९ मिमी. पाऊस झाला आहे. जुलैमध्ये पावसाने ताण दिल्याने शेतकरी चिंतीत झाला होता. मात्र बुधवारी चांगला पाऊस झाल्याने आता शेतकरी सुखावला आहे. त्याचवेळी जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटही उद्‌भवले होते ते आता दूर झाले आहे. उर्वरित १२ टक्के पेरण्याही या पावसाने पूर्ण होतील, असे जिल्हा कृषी अधीक्षक आर.बी. चलवदे यांनी सांगितले.