शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड येथे रस्त्यावर मोकाट जनावरे आढळल्यास मालकाविरुद्ध फौजदारी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 20:24 IST

आगामी काळात जनावरे रस्त्यावर आढळल्यास मालकाविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

नांदेड : शहरातील प्रमुख मार्गावर अडथळा निर्माण करणार्‍या मोकाट जनावरांना उचलण्याची कार्यवाही मनपाने मंगळवारी रात्रीपासून सुरू केली आहे. रात्रभर चाललेल्या या कारवाईत ५१ जनावरे कोंडवाड्यात टाकली. आगामी काळात जनावरे रस्त्यावर आढळल्यास मालकाविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

शहरात अनेक दिवसांपासून मोकाट जनावरे भररस्त्यावर ठाण मांडत आहेत. याचा वाहनचालकांना फटका बसत आहे. तसेच अनेक लहान-मोठे अपघातही होत आहेत. परिणामी या जनावरांवर आळा घालण्यासाठी मंगळवारी रात्री  महापालिकेचे लेखाधिकारी संतोष  कंदेवार, डॉ. रईसोद्दीन यांच्यासह क्षेत्रीय अधिकार्‍यांनी मोहीम राबवित ५१ मोकाट जनावरे गोकुळनगर येथील कोंडवाड्यात टाकली.  बुधवारी दुपारी जनावरांचे मालक तसेच काही संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी आयुक्तांची भेट घेऊन सदर जनावरे सोडण्याची विनंती केली. दंडात्मक कारवाई करुन ती सोडण्यात आली. मात्र आगामी काळात आता जनावराच्या मालकाविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त गणेश देशमुख यांनी दिला आहे.  दरम्यान, उन्हाळ्याच्या दिवसांत नागरिकांनी खाद्यपदार्थ कॅरिबॅगमध्ये टाकून उघड्यावर अथवा रस्त्यावर टाकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. या कॅरिबॅगमधील अन्न खाल्ल्याने विषबाधेद्वारे जनावरांना बाधा पोहोचते. त्यातून होणारे कटू प्रसंग टाळण्याचे आवाहन मनपाने केले आहे. 

टॅग्स :Nandedनांदेड