शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चाकूचा धाक दाखवून जोडप्याला लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:17 IST

जिल्ह्यात दोन दुचाकी चोरीला नायगाव शहरातील जनता हायस्कूल परिसरातून चोरट्याने दुचाकी लांबविली. जगन्नाथ शिवराज जाधव यांनी एम.एच.२६, बीव्ही ७७३५ ...

जिल्ह्यात दोन दुचाकी चोरीला

नायगाव शहरातील जनता हायस्कूल परिसरातून चोरट्याने दुचाकी लांबविली. जगन्नाथ शिवराज जाधव यांनी एम.एच.२६, बीव्ही ७७३५ या क्रमांकाची दुचाकी उभी केली हाेती. या प्रकरणात नायगाव ठाण्यात गुन्हा नोंद झाला. तर नांदेड शहरातील दत्तनगर भागात गंगाधर यानपलेवार यांची खंडोबा मंदिराच्या मागे ठेवलेली एम.एच.२६, बीबी १५०३ ही दुचाकी लांबविण्यात आली. या प्रकरणात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

मारतळा येथे टॉवरचे साहित्य लंपास

मारतळा येथील जिओ कंपनीच्या टॉवरमधील साहित्याची चोरी करण्यात आली. टॉवरमधील सोलारची पावर केबल, जंक्शन बॉक्स असे आठ हजार रुपये किमतीचे साहित्य लंपास करण्यात आले. या प्रकरणात प्रदीप सुभाष पवार यांच्या तक्रारीवरुन उस्मान नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

बैल खरेदीचे पैसे देण्यास नकार

मुखेड तालुक्यातील मौजे अंबुलगा येथून काही शेतकऱ्यांकडून बैल खरेदी करण्यात आले होते. त्यातील काही रक्कम दिल्यानंतर उर्वरित २ लाख ५ हजार रुपये एक महिन्यात देण्याचे ठरले होते. परंतु शेतकरी माधव गोविंद गरडे हे पैसे मागण्यासाठी गेले असता टाळाटाळ करण्यात आली. या प्रकरणात मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात गरडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तरुणीसह आजीला केली मारहाण

शहरातील चिरागगल्ली भागात तरुणीसह तिच्या आजीला चार जणांनी मारहाण केली. ही घटना ११ मे रोजी घडली. आरोपींनी जुन्या वादातून निकिता अशोकसिंह परमार यांच्या आजीला मारहाण केली होती. भांडण सोडविण्यासाठी निकिता मध्ये पडल्या. त्यानंतर आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. या प्रकरणात इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.