शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणात कापूस वेचणीसाठी किनवट तालुक्यातील मजूर, रोजगार हमी योजनेतील कामे रखडल्याने स्थलांतर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 12:19 IST

किनवट तालुक्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांची वाणवा असल्याने हजारो हात रिकामे आहेत़ कामाच्या शोधात मजूर परप्रांतात जात आहेत.

ठळक मुद्देल मजुरांना ने - आण  व सात रुपये प्रतिकिलो कापूस वेचणी मिळू लागल्याने तेलंगणात मोठ्या प्रमाणावर मजूर जात आहेत. किनवट तालुक्यात १ लाख नोंदणीकृत मजूर व ४२ हजार जॉबकार्ड धारक कुटुंब आहेत.

नांदेड : किनवट तालुक्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांची वाणवा असल्याने हजारो हात रिकामे आहेत़ कामाच्या शोधात मजूर परप्रांतात जात आहेत़ सध्या कापूस वेचणी हंगाम सुरू असून सीमावर्ती भागातील मजुरांना ने - आण  व सात रुपये प्रतिकिलो कापूस वेचणी मिळू लागल्याने तेलंगणात मोठ्या प्रमाणावर मजूर जात आहेत. 

किनवट तालुक्यात १ लाख नोंदणीकृत मजूर व ४२ हजार जॉबकार्ड धारक कुटुंब आहेत. मागेल त्याला काम कामाप्रमाणे दाम देण्यासाठी शासनाने २ फेब्रुवारी २००६ रोजी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली. साडेअकरा वर्षाचा कालावधी ही योजना सुरू होवून लोटत आला तरी तालुक्यात या योजनेला म्हणावे तसे अच्छे दिन आले नाहीत. परिणामी हजारो मजुरांच्या रोजीचा प्रश्न कायम आहे. अलीकडच्या काळात मग्रारोहयोला घरघर लागली आहे़ परिणामी मजुरांच्या हाताला कामच मिळत नसल्याचे चित्र आहे. तालुक्यात मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणावर असताना हाताला कामच मिळत नसल्याने हजारो हात  रिकामेच आहेत. घरकुल व रोपवाटीका अशी पंचायत समिती व यंत्रणेची काही बोटावर मोजण्याइतकी कामे सुरू असून तीनशेच्या आसपास मजूर कामावर आहेत. १ लाख नोंदणीकृत मजूरसंख्या असताना प्रत्यक्षात कामावरील मजुरांचा आकडा पाहता मग्रारोहयोचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. हातावर आणून पानावर खाणा-या मजुरांची संख्या मोठी आहे. कुटुंबाच्या कुटुंबच रिकामे असल्याने मजुरांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. 

सध्या कापूस हंगाम सुरू आहे. तालुक्यातील शेतकरी ३ ते ५ रुपये प्रतिकिलो वेचणीचे दर देत असल्याने हे भाव परवडणारे नसल्याने कापूस वेचणीकडे मजुरांनी पाठ फिरविली आहे. त्यात कापूस पिकाचा उताराही कमी असल्याने मजुरांना ते परवडत नाही. असे असतानाच लगतच्या तेलंगणात कापूस पिकांचे प्रचंड क्षेत्र असल्याने तेथील शेतकरी किनवट तालुक्याच्या सीमावर्ती भागातील गावात येवून मजुरांशी संपर्क साधून त्यांना कापूस वेचणीसाठी तेलंगणात नेत असल्याचे पहावयास मिळत आहे. प्रतिकिलो सात रुपये व ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली जात असल्याने रिकाम्या हाताने असलेले मजूर तेलंगणात कापूस हंगाम झोडपतांना दिसत आहेत़ मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्यासाठी गावोगाव मग्रारोहयोची कामे सुरू करावी अशी मागणी मजूर वर्गाची आहे़ परंतु प्रशासन ढिम्मच आहे. 

मग्रारोजगार हमी योजना अशीतशीचसुरुवातीपासूनच मग्रारोहयोला तालुक्यात ग्रहण लागल्याने ही योजना अशीतशीच राबवल्या गेली. ७७७ मस्टरची मजुरी थकल्याने हे प्रकरण मागील कालखंडात चांगलेच गाजले़ विधी मंडळातही हा प्रश्न उपस्थित झाला. चौकशी, तपासणी या फे-यात अडकलेल्या या मस्टरचा निपटारा बीडीओ दिलीप इंगोले यांनी करून थकलेल्या रकमा मजूर व लाभार्थ्यांच्या हातात देवून ७७७ चा विषय संपविला़ आता नव्या कामांना मंजुरी देवून ही योजना प्रभावीपणे राबवून मागेल त्याला काम व कामाप्रमाणे दाम हा हेतू सफल करावा, हे विशेष.