शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : 'शेतात राहण्यास गेले कोरोनामुक्त झाले; कोरोनामुक्‍तीचा भोसी पॅटर्न आता संपूर्ण नांदेड जिल्ह्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 18:39 IST

corona virus : बाधितांना त्‍यांच्‍या शेतातच राहण्‍याची सोय करण्‍यात आली. ज्‍यांच्‍याकडे शेती नाही त्‍यांची सोय प्रकाश भोसीकर यांच्‍या शेतात शेडमध्‍ये करण्‍यात आली.

ठळक मुद्देमुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी घेतला निर्णय१५ दिवसांत ११९ कोरोनामुक्त, शेतात जाऊन औषध, जेवण पुरवले

नांदेड : हॉटस्पॉट ठरलेल्या भोकर तालुक्यातील भोसी गावात ११९ कोरोनाबाधित रुग्ण शेतात राहून कोरोनामुक्त झाले. त्यानंतरच्या दीड महिन्यात गावात एकही कोरोनाबाधित आढळलेला नाही. कोरोनामुक्‍तीसाठी भोसी गावाने राबविलेला हा पॅटर्न ग्रामीण भागासाठी दिशादर्शक आहे. त्यामुळे हा पॅटर्न आता जिल्‍ह्यातील प्रत्येक गावात राबविणार असल्‍याचे जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी सांगितले.

भोकर तालुक्‍यातील भोसी प्राथमिक आरोग्‍य केंद्रांतर्गत सर्व आरोग्‍य कर्मचारी, आशा वर्कर, परिचारिका, अंगणवाडी कार्यकर्ती, वैद्यकीय अधिकारी यांची बैठक घेऊन ठाकूर यांनी ऑनलाइन संवाद साधला. या बैठकीस जिल्‍हा परिषद सदस्‍य प्रकाश देशमुख-भोसीकर, जिल्‍हा आरोग्‍य आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, तालुका आरोग्‍य अधिकारी डॉ. राहुल वाघमारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. यू. एम. डोंगरे आदींची उपस्थिती होती. दोन महिन्‍यांपूर्वी एका लग्‍नसोहळ्यानंतर भोसी येथे एकजण कोरोनाबाधित आढळला. त्‍यानंतर पाचजण बाधित आले. ग्रामस्थांनी कोरोनाची प्रचंड धास्ती घेतली होती. मात्र, जिल्‍हा परिषद सदस्‍य प्रकाश भोसीकर यांनी आरोग्‍य विभागाच्‍या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ग्रामस्‍थाचे समुपदेशन केले. कोरोना चाचणीनंतर तब्‍बल ११९ जण बाधित आढळलेे.

१५ दिवसांत ११९ कोरोनामुक्त, शेतात जाऊन औषध, जेवण पुरवलेबाधितांना त्‍यांच्‍या शेतातच राहण्‍याची सोय करण्‍यात आली. ज्‍यांच्‍याकडे शेती नाही त्‍यांची सोय प्रकाश भोसीकर यांच्‍या शेतात शेडमध्‍ये करण्‍यात आली. आरोग्‍य सेविका, आशा, अंगणवाडी कार्यकर्ती यांनी दररोज शेतात जाऊन बाधितांशी संवाद साधून त्‍याच ठिकाणी औषधी व जेवण पुरविले. या उपक्रमामुळे पंधरा दिवसांत ११९ कोरोनाबाधित कोरोनामुक्‍त झाले. बाधित व्‍यक्‍ती गाव सोडून शेतात राहिल्‍यामुळे गावात कोरोना पसरू शकला नाही. या उपक्रमाबाबत मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी तालुका आरोग्‍य अधिकारी डॉ. राहुल वाघमारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. यू. एम. डोंगरे यांच्यासह सर्व आरोग्‍य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. भोसी येथे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी समन्‍वय ठेवून जसा पॅटर्न राबविला तसाच पॅटर्न जिल्‍ह्यात राबविण्‍यात यावा, असे निर्देश त्‍यांनी दिले. जिल्‍हा परिषद सदस्‍य प्रकाश भोसीकर यांच्याकडून डॉ. बालाजी शिंदे यांनी या उपक्रमाची सविस्तर माहिती घेतली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNandedनांदेड