शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

Corona Virus In Nanded : उमरीत कोरोनाचा संशयित आढळला; होम क्वारंटाईन नागरिकांवर नाही कोणाचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 20:56 IST

21 मार्चपासून परतलेल्या तरुणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

ठळक मुद्देपर गावातून परतलेले होम कॉरंटाईन बाहेर फिरताना आढळले

उमरी  : तालुक्यातील अब्दुल्लापुरवाडी येथे  कोरोना साथ रोगाचा एक  संशयित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुरुवातीच्या काळात तालुक्यात याबाबत काळजी घेतली जात होती  मात्र आता  या प्रकारामुळे प्रशासकीय यंत्रणेची उदासीनता दिसून येत आहे.       आज ३० मार्च रोजी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास तीस वर्षे वयाचा एक तरुण  संशयित रुग्ण उमरीच्या  ग्रामीण रुग्णालयात दाखल झाला.  वैद्यकीय अधीक्षक डॉ शंकर चव्हाण यांनी त्यास तपासले असता , कोरोना साथरोगाच्या संदर्भातील सर्व  लक्षणे त्याला दिसून आली.   तसेच हा रुग्ण गेल्या २१  मार्च रोजी पुणे येथून त्याची सासुरवाडी असलेल्या  अब्दुल्लापुरवाडी येथे आलेला आहे.  मध्यंतरीच्या कालावधीत तो कुठे गेला ?  कुणाकुणाशी त्याची भेट झाली ?  कोणत्या कार्यक्रमात सामील झाला ?  याची माहिती यंत्रणेमार्फत आता  घेण्यात येत आहे . मात्र तब्बल बारा दिवस त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नव्हते हे विशेष होय .

याच गावात पुणे येथून ५०  ते ६० नागरिक आलेले आहेत. या सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन देवराये यांनी दिली.  याबाबत तालुक्यात काम करणाऱ्या इतर खात्याच्या   प्रशासकीय यंत्रणेची   कमालीची उदासीनता दिसून येत आहे .  सध्या उमरी तालुक्यात कोरोना साथरोगा विषयी सतर्कता बाळगली जाते .    तसेच बाहेरून आलेल्या नागरिकांची नोंदणी केली जाते.  ही कामे आशा वर्कर ,  अंगणवाडी कर्मचारी , आरोग्य विभागाचे कर्मचारी  आदींकडे  सोपविण्यात आली .  तलाठी , ग्रामसेवक ही  कामे  करीत असल्याचे सांगण्यात येत असले तरीही  मोजकेच तलाठी व  ग्रामसेवक या कामामध्ये दिसून येतात.  कारण अंगणवाडी कर्मचारी व आशा वर्कर यांना गावात योग्य माहिती दिली जात नाही.

या महिला कर्मचारी गावातील रहिवासी  असल्याने त्यांच्यावर काही मर्यादा येतात. होम क्वारंटाईन  असलेल्या एवढ्या लोकांना बाहेर फिरण्यासाठी त्या मज्जाव करू शकत नाहीत.   मात्र तलाठी व ग्रामसेवक या कर्मचाऱ्यांनी  याबाबत अधिक लक्ष देऊन  काम करण्याची गरज आहे.   त्यामध्ये बऱ्याच अंशी ते कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. उमरी तालुक्यात एकूण तीन मंडळ असून १९  सज्जा आहेत.  यात काम करण्यासाठी तलाठी पदाची १९  मंजूर पदे असली तरी फक्त १४  तलाठी कार्यरत आहेत. यातील बहुतांशी कर्मचारी हे नांदेड येथून अपडाऊन करतात.  सहा गावांच्या सज्जावर एक तलाठी काम करीत असून काही तलाठ्यांना सहा पेक्षाही अधिक गावे देण्यात आलेली आहेत.  म्हणून ते या गावावर एकाच वेळी लक्ष ठेवू शकत नाहीत . तसेच तालुक्यात ग्रामसेवकांची ४३  मंजूर पदे असून ४१  ग्रामसेवक कार्यरत आहेत.  दोन पदे रिक्त आहेत . असे असले तरीही तालुक्यातील बहुतांशी मोठ्या लोकवस्तीच्या गावातील ग्रामसेवक तसेच तलाठी गावाकडे फिरकतही नाहीत .  असे चित्र दिसून येत आहे. 

म्हणूनच मुंबई , पुणे,  नागपूर,  हैदराबाद ,  यवतमाळ येथून उमरी तालुक्यात आलेले अनेक नागरिक  होम क्वारंटाईन  असले तरी  वारंवार सूचना देऊनही ते घरामध्ये थांबत नाहीत . उमरीमध्ये असाच प्रकार  चालू असल्याने शेवटी  त्या  होम क्वारंटाईन  नागरिकांना नगरपालिकेतर्फे नोटिसा देऊन घरी बसवावे लागले.  यावरून वादविवादही झाले. शहरात ही अवस्था आहे तर खेडेगावातील परिस्थितीची कल्पनाच न केलेली बरी.   यातील अनेकजण गावामध्ये रिकामटेकडे फिरत आहेत  .  गप्पागोष्टी करण्यासाठी मित्रमंडळींमध्ये बसत आहेत.   याबाबतची माहिती वरिष्ठांकडे पोचविणे तसेच अशा प्रकारच्या नागरिकांना सूचना देणे ही बाब गावातीलच रहिवासी असलेल्या अंगणवाडी,  आशा वर्कर या कर्मचाऱ्यांना  अशक्‍य होत असल्याचे दिसून येत आहे.  मात्र नेमके याकडेच वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असताना दिसून येते आहे.

करोना सारख्या महाभयंकर साथीमुळे संपूर्ण जग हादरून गेलेले आहे आणि अगदी आपल्या गावात ,  गल्लीतच कोरोना सारख्या साथरोगाच्या  बाधित शहरातून अनेक नागरिक आलेले आहेत . म्हणून त्यांची अजून १४  एप्रिल पर्यंत गांभीर्यपूर्वक काळजी घेणे व त्यांच्यावर देखरेख ठेवणे गरजेचे झाले आहे . मात्र आता अन्नदान करणे , मास्क , सॅनिटायझर आदी  वस्तूंचे वाटप करणे अशा सवंग लोकप्रियतेच्या नावाखाली फोटोसेशन सुरू झाले आहे.  यावेळी  सोशल डिस्टन्सींगचा  फज्जा उडत असल्याचे विदारक चित्र   दिसून येत आहे .

विशेष म्हणजे अशाप्रकारच्या  प्रसिद्धीसाठी हपापलेले  काही कार्यकर्ते  व गावपुढारी , अधिकारी वर्गालाही यात सामावून घेऊन  आपला कार्यभार उरकण्याचा केविलवाणा  प्रयत्न करताना दिसत आहेत.  मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याला बळी न पडता  कठोर  भूमिका घेऊन  लॉकडाऊनची   काटेकोरपणे  अंमलबजावणी करावी अशी अनेक नागरिकातून मागणी होत आहे. 

तलाठी आपल्या सज्जावर सकाळी लवकरच दुचाकीवरून जातात व आवश्यक ती माहिती संकलित करतात.   सायंकाळी ते लवकरच परत घरी जातात.  गावामध्ये राहण्यासाठी त्यांच्याकडे कुठलीच व्यवस्था नाही. - माधव बोथीकर,तहसीलदार,उमरी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड