शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

लिंगायतांना अल्पसंख्यांकाचा दर्जा देण्याची काँग्रेसची लेखी ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:21 IST

लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता व राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यांक दर्जा देण्याची लेखी ग्वाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण यांनी दिली़ त्यानंतर लिंगायत समन्वय समितीने राज्यभरात काँग्रेसच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला

नांदेड : लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता व राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यांक दर्जा देण्याची लेखी ग्वाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण यांनी दिली़ त्यानंतर लिंगायत समन्वय समितीने राज्यभरात काँग्रेसच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला असून त्याची घोषणा गुरुवारी नांदेड येथे पत्रकार परिषदेत करण्यात आली़या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण यांच्यासह लिंगायत समन्वय समितीचे राष्ट्रीय समन्वयक अविनाश भोसीकर, राज्य समन्वयक माधवराव पाटील टाकळीकर, प्रदीप बुरांडे, विजयकुमार दत्तुरे, आनंद कर्णे, राजेश विभुते यांच्यासह लिंगायत समाजातील अनेकांची उपस्थिती होती़ लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता व राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यांक दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ यासह इतर राज्यात लिंगायत समाजाच्या वतीने अनेक मोर्चे काढण्यात आले होते़या मागणीला प्रतिसाद देत कर्नाटक राज्य काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकारने लिंगायत धर्माचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करून केंद्र सरकारला संविधानिक मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवला़ तसेच राज्यात अल्पसंख्यांक दर्जा लागू केला़ परंतु केंद्रातील भाजपा सरकारने लिंगायत समाजाच्या मागण्यांबाबत अभ्यास न करता तो अहवाल फेटाळून लावला़ कर्नाटक राज्याच्या धर्तीवर लिंगायत स्वतंत्र मान्यतेचा प्रस्ताव केंद्रात पाठवून राज्यात लिंगायतांना अल्पसंख्यांक दर्जा देण्याचे लेखी आश्वासन प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी दिले आहे़ त्यामुळे लिंगायत समाजाने संपूर्ण ताकदीनिशी राज्यात काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे़ अशी भूमिका लिंगायत समन्वय समितीने स्पष्ट केली़यावेळी हरिहरराव भोसीकर, बालाजी पांडागळे, किशोर स्वामी, प्रवक्ता संतोष पांडागळे, नगरसेवक राजू काळे, केशवअप्पा खिचडे, नामदेव पटणे, विनोद कांचनगिरे, प्रा़रविकांत काळे आदींची उपस्थिती होती़महापुरुषांच्या स्मारकावरून भाजपाचे राजकारणमहापुरुषांच्या राष्ट्रीय स्मारकांचे भाजपा सरकार राजकारण करीत आहे़ एकाही महापुरुषाच्या राष्ट्रीय स्मारकाचे काम या सरकारच्या मागील साडेचार वर्षाच्या कार्यकाळात पूर्ण झाले नाही़ त्यामुळे अशा विश्वासघातकी सरकारच्या विरोधात आंदोलने सुरू आहेत़ नांदेड शहरात उभारण्यात येत असलेल्या महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून लिंगायत समाज एकजुटीने काँग्रेसच्या पाठीशी असल्याचेही अशोकराव चव्हाण यावेळी म्हणाले़

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेड