शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचार व राजकारणाचा अड्डा बनल्याने एसटी महामंडळाची ही अवस्था: राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 17:13 IST

Raju Shetty भाजपने सरकार असतांना काय केले, असा सवाल राजू शेट्टी यांनी केला

- गोविंद टेकाळेअर्धापूर ( नांदेड ) : - महाराष्ट्राची लालपरी अर्थात एसटी महामंडळ (ST Strike ) आज घडीला भ्रष्टाचार व राजकारणाचा अड्डा बनला आहे. यामुळे एसटीचे अर्थकारण बिघडून सध्याची बिकट परिस्थिती निर्माण झाल्याची टीका  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे‌ नेते व माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केली.

ते पुढे म्हणाले, महाराष्ट्राची लालपरी ही सर्वसामान्य माणसांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आज घडीला ही लालपरी गचके खायला लागली आहे. यास गेल्या काही काळामध्ये राज्यात सत्तेत असलेली सरकारे जबाबदार आहेत.  मोठमोठ्या घोषणा करून सर्व बोजा महामंडळ वर टाकायचा टायर खरेदी,साहित्य खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार करायचा महामंडळ राजकारणाचा अड्डा बनला असून याचे परिणाम आज एसटीचे अर्थ कारण बिघडून गेले आहे. एसटी जनसामान्यांनचा आधारवड आहे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवत बजेटमध्ये भरीव तरतूद करून एसटी महामंडळ वाचवावे लागेल. यासाठी एसटीचे सरकारीकरण करणे हा पर्याय आहे. यासाठी कामगारांनी सुद्धा विचार करणे गरजेचे आहे, असे शेट्टी म्हणाले. यावेळी माजी अध्यक्ष वस्त्रोद्योग महामंडळ रविकांत तुपकर,माजी प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ. प्रकाश पोपळे,स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगोरे,अमोल हिप्परगे सोलापूर,स्वाभिमानी शिक्षक संघटना मराठवाडा अध्यक्ष सतीश सोनटक्के,जिल्हाध्यक्ष शिक्षक संघटना शेख जावेद,जेष्ठ नेते किशनराव कदम यांच्या सह अनेकजन उपस्थितीत होते.

भाजपने सरकार असतांना काय केले,भारतीय जनता पार्टीचे नेते एसटी कामगारांसाठी आंदोलन करत आहेत. त्यांनी त्यांचे सरकार असतांना एसटीसाठी काय केलं याचं उत्तर द्यावे लागेल. कारण जनता त्यांच्याकडे उत्तर मागत आहे. सर्वांनीच एसटीचा फक्त वापरून घेतला आहे असे ही शेट्टी म्हणाले. 

टॅग्स :ST Strikeएसटी संपNandedनांदेडRaju Shettyराजू शेट्टी