शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडात बंदला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:08 IST

‘पद्मावत’ चित्रपटाला विरोध दर्शविण्यासाठी नांदेड शहरात गुरूवारी पुकारलेल्या बंदला दक्षिण नांदेड भागात उस्फुर्त तर अन्य भागात समिश्र मिळाला़ दरम्यान, दक्षिण नांदेडात येणा-या कौठा भागात बसवर झालेल्या दगडफेकीत एसटीचे ४० हजार रूपयांचे नुकसान झाले़

ठळक मुद्देबसवर दगडफेक : परिवहन महामंडळाचे ४० हजारांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : ‘पद्मावत’ चित्रपटाला विरोध दर्शविण्यासाठी नांदेड शहरात गुरूवारी पुकारलेल्या बंदला दक्षिण नांदेड भागात उस्फुर्त तर अन्य भागात समिश्र मिळाला़ दरम्यान, दक्षिण नांदेडात येणा-या कौठा भागात बसवर झालेल्या दगडफेकीत एसटीचे ४० हजार रूपयांचे नुकसान झाले़राणी पद्मावतीने केलेल्या अग्नी जौहरचा राजपुत समाजात विशेष सन्मानाने उल्लेख केला जातो़ परंतु, राजपुत समाजाचा गौरवशाली इतिहासावर केवळ मनोजरंजनाच्या उद्देशाने चित्रपट काढून समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप अनेक राजपुत संघटनांनी केला आहे़ पद्मावतच्या विरोधात मंगळवारी राजपुत संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा काढून निषेध व्यक्त केला होता़राजपूत संघर्ष समिती आणि शहरातील काही हिंदुत्ववादी संघटनांनी गुरूवारी नांदेड शहर बंदची हाक दिली होती़ यास शहरात समिश्र प्रतिसाद मिळाला़ दक्षिण नांदेड भागातील गाडीपुरा, जुना मोंढा, वजिराबाद भागातील बहुतांश दुकाने दिवसभर बंद होती़ तर अन्य भागात दुपारनंतर व्यापा-यांनी प्रतिष्ठाने उघडली़ गाडीपु-यातील श्री रेणुका माता मंदिर परिसरात एकत्र आलेल्या शेकडो राजपूत समाजबांधवांनी ‘पद्मावत’ चित्रपटाचे निर्माते भन्साळी विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन निषेध नोंदविला.नांदेड शहर बंदला कौठा भागात बसवर झालेल्या दगडफेकीने गालबोट लागले़ या परिसरात एमएच २० बीसी १९६६ या क्रमांकाच्या बसवर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी अचानक येऊन दगडफेक करीत बस जाळण्याचा प्रयत्न केला़ यामध्ये सदर बसचे जवळपास ४० हजार रूपयांचे नुकसान झाले असून कोणतीही जिवितहाणी झाली नसल्याचे नांदेड बसस्थानक प्रमुख एऩ एस़ निम्मनवाड यांनी सांगितले़ याप्रकरणी ग्रामीण ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे़ बंद दरम्यान शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.‘पद्मावत’ चित्रपट प्रदर्शनाच्या पार्श्वभूमिवर मागील दोन दिवसांपासून पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. शहरातील ई-स्क्वेअर, पीव्हीआर या सिनेमागृहात बुधवारी सायंकाळीच मोठ्या पोलीस बंदोबस्तात ‘पद्मावत’ प्रदर्शित झाला. चित्रपटगृह परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.चित्रपट प्रदर्शीत झाल्यानंतर जवळपास ९०० जणांनी पहिल्याच दिवशी हा चित्रपटगृहात हजेरी लावली. तर गुरूवारीदेखील मोठ्या बंदोबस्तात सिनेमाचे सर्व शो झाले असून वादग्रस्त ठरलेल्या या चित्रपटाला पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येत हजेरी लावत असल्याचे चित्र गुरुवारी पहायला मिळाले.