शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्हा परिषदेच्या अधिका-यांच्या नियोजनावर समिती सदस्य नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:33 IST

जिल्ह्यातील विकासकामांचे नियोजन करताना अधिकारी, विभागप्रमुख नियोजन समिती सदस्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप करीत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली़ यावेळी सदस्यांनी विविध कामे सुचविली़

ठळक मुद्देनियोजन समितीची बैठक : विकासकांसाठी सदस्यांनी केल्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यातील विकासकामांचे नियोजन करताना अधिकारी, विभागप्रमुख नियोजन समिती सदस्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप करीत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली़ यावेळी सदस्यांनी विविध कामे सुचविली़जिल्हा वार्षिक योजना सन २०१८-१९ च्या प्रारुप आराखड्याची छाननी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या लहान गटाची बैठक आ़नागेश पाटील आष्टीकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे पार पडली़यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, जिल्हा नियोजन समिती सदस्या शैलजा स्वामी, डॉ. अशोक बेलखेडे, बबन बारसे, संजय बेळगे आदी सदस्य व विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते़या बैठकीत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना व अनुसूचित जाती उपयोजना, अनुसूचित जमाती उपयोजना प्रारुप आराखड्याच्या छाननीसंदर्भात तसेच अद्ययावत २०१७-१८ मध्ये खर्च झालेला निधी व २०१८-१९ मध्ये प्रस्तावित कामे यासंदर्भात आ़ पाटील यांनी आढावा घेतला. विष्णूपुरी येथील शासकीय रूग्णालयातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जुन्या विहिरीची दुरूस्ती करून विहिरीचे पुनर्भरण करण्याची मागणी डॉ़ बेलखोडे यांनी यावेळी केली़जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय बेळगे यांनी ग्रामीण भागातील प्रश्न मांडले़ ग्रामपंचायतीला अधिकचा निधी उपलब्ध करून देणे तसेच पंजाबराव देशमुख कर्ज व्याज सवलत योजनेसंदर्भात जनजागृती करणे, रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढल्याने सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला असून रोहित्र उपलब्धतेसाठी अधिक निधी देणे आदी मागण्या केल्या़