शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक ! विष्णूपुरीच्या रुग्णालयात लवकरच बायपास सर्जरी विभाग होणार सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 16:48 IST

एक वर्षापूर्वी शासकीय रुग्णालयाच्या वतीने  मोडुलर प्लॉन देण्यात आला आहे.

ठळक मुद्देगोरगरीब रुग्णांना मिळणार मल्टीस्पेशालिटी सुविधा

नांदेड : औरंगाबाद वगळता नांदेडचे विष्णुपूरी येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय हे अद्ययावत आरोग्य सेवा सुविधा असलेले मराठवाड्यातील एकमेव रुग्णालय आहे. या शासकीय रुग्णालयात लवकरच मल्टीस्पेशालिटी सुविधा सुरु होणार आहेत. बायपास सर्जरी विभाग सुरु विभागासाठी अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. 

एक वर्षापूर्वी शासकीय रुग्णालयाच्या वतीने  मोडुलर प्लॉन देण्यात आला आहे.  त्यानंतर आरोग्य मंत्र्यांकडेही सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. आरोग्य मंत्र्यांनीदेखील विशेष लक्ष दिल्याने लवकरच नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील सुपर स्पेशालीटी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येते. सध्या विष्णुपूरीच्या शासकीय रुग्णालयात मल्टी सुपर स्पेशालिटीनुसार १३ मॉडुलर सर्जरी विभाग (ओटी) बांधून तयार आहेत. मात्र, त्यापैकी सहा ते सात सर्जरी विभाग सुरु आहेत. इतर सर्जरी विभाग बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयात हृयाच्या सर्व प्रकारच्या गुंतागुंतीच्या सर्जरी, न्युरो व युरो (किडनी व ब्रेन) सर्जरी विभाग सुरु झाल्यास  गोरगरीब रुग्णांना त्याचा मोठा लाभ मिळणार आहे.  

हा विभाग सुरु झाल्यास नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, लातूर, बीड, उस्मानाबादसह नांदेड जिल्ह्याच्या सीमाभागास लागून असलेल्यास तेलंगणा व कर्नाटक राज्यातील रुग्णांनादेखील दिलासा मिळणार आहे.अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख हे कार्डियाक युनिट, कार्डियालॉजिस्ट कॅथलॅब सुरु करण्यासाठी अधिक प्रयत्नशील आहेत. एखाद्या रुग्णास खासगी रुग्णालयात बायपास सर्जरी करायची झाल्यास त्यासाठी किमान दीड ते दोन लाखांच्या पुढे खर्च येतो. त्यामुळे अनेक रुग्णांच्या खिशाला हा खर्च परडवणारा नसतो. मात्र, नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हा विभाग झाल्यास त्याचा गरजूवंतांना चांगला फायदा होणार आहे.

विभाग कार्यान्वित करण्याच्या हालचालीनांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्व आरोग्य सुविधा आहेत. परंतु, हृदयाच्या सर्व प्रकारच्या गुंतागुंतीच्या सर्जरी, न्यूरो व युरो (किडनी व ब्रेन) सर्जरी विभाग तेवढा नाही. म्हणून, कॅथलॅब सुरु करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी आरोग्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे. त्यामुळे लवकरच हा विभाग प्रत्यक्षात येईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही, अशी माहिती अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख यांनी दिली.

टॅग्स :Nandedनांदेडdoctorडॉक्टर