हदगाव (जि. नांदेड) : प्राणघातक हल्ला झाल्याच्या पंजाबराव शिंदे यांनी केलेल्या तक्रारीवरुन आ़ नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह त्यांचा पुत्र व इतरांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे़पोलिसांना देण्यात आलेल्या फिर्यादीमध्ये आमदार आष्टीकर यांच्या समर्थकांनी बेदम मारहाण केल्याचे नमूद करण्यात आले आहे़ आरोपांमागे राजकीय षडयंत्र असू शकते़ त्यासाठी प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे़
आ. आष्टीकरांसह त्यांच्या पुत्रावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 03:44 IST