शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जात प्रमाणपत्राच्या हमीपत्राला ब्रेक; ग्रामपंचायत निवडणुकीत जातवैधता प्रमाणपत्र अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 16:37 IST

ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी आरक्षित जागेवरील उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे़ यापूर्वी जात पडताळणी समितीकडे वैधतेसाठी दाखल केलेल्या प्रस्तावाची पावती किंवा सहा महिन्यांचे हमीपत्र चालणार नाही़ 

बिलोली (नांदेड ) : ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी आरक्षित जागेवरील उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे़ यापूर्वी जात पडताळणी समितीकडे वैधतेसाठी दाखल केलेल्या प्रस्तावाची पावती किंवा सहा महिन्यांचे हमीपत्र चालणार नाही़ त्याचप्रमाणे नामांकन अर्जप्रक्रिया पारंपरिक (आॅफलाईन) प्रमाणे होणार होते, मात्र २ फेब्रुवारी रोजी सुधारित आदेश आले असून नामांकन अर्ज संगणकीय (आॅनलाईन) पद्धतीने घेतले जाणार आहेत, अशी माहिती निवडणूक विभागाने दिली़ परिणामी नव्या आदेशाने आरक्षित जागेवरील उमेदवारांची चांगलीच गोची झाली आहे़

२२ जानेवारीच्या राज्य निवडणूक आदेशान्वये ग्रामपंचायतच्या रिक्त असलेल्या सरपंच व सदस्यांकरिता पोटनिवडणूक होत आहे़ निवडणूक आयोगाने ५ फेब्रुवारीपासून नामांकन प्रक्रिया तर २७ रोजी मतमोजणी निश्चित केली़ आता अनुसूचित जमाती (एस़टी़), अनुसूचित जाती (एस़सी़) तसेच इतर मागासवर्ग (ओबीसी) या आरक्षित जागेवरील उमेदवारांसाठी जातवैधता प्रमाणपत्र अत्यावश्यक केले आहे़ ६ महिन्यांच्या हमीपत्राची पद्धत बंद करण्यात  आली़ त्यामुळे सरपंच अथवा सदस्यासाठी असलेल्या जागेसाठी जातवैधता प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे. बहुसंख्य जागेसाठी या आरक्षित पदासाठी  उमेदवारच मिळाले नसल्याने पोटनिवडणूक होत आहे़ 

हमीपत्रावरच वर्ष उलटले़बिलोली तालुक्यातील कुंडलवाडीच्या नगराध्यक्षा डॉ़अरुणा कुडमुलवार तर बिलोली पंचायत समितीच्या सभापती भाग्यश्री अनपलवार या पदाधिकार्‍यांकडे अद्याप वैधता प्रमाणपत्र नाही़ दरम्यान, मुन्नेरकापू व महादेव कोळी या जात प्रमाणपत्रावर दोन्हीही पदाधिकारी वर्षभरापूर्वी निवडून आले़ सहा महिन्यांचे हमीपत्र देवूनही अद्याप वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही़ मुन्नेरकापू ही जात तेलंगणात ओबीसी असून याच         प्रमाणपत्राच्या आधारे डॉक़ुडमुलवार कुंडलवाडी येथे निवडून आल्या़ तर अटकळी गणातून भाग्यश्री अनपलवार महादेव कोळी जात प्रमाणपत्रावर निवडून आल्या आहेत़ 

टॅग्स :ElectionनिवडणूकNandedनांदेड