जिल्ह्यात पुन्हा एका २६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात २४ मृत्यू हे विविध शासकीय रूग्णालयात झाले आहेत. सर्वाधिक १२ मृत्यू हे जिल्हा रूग्णालय काेव्हिड हाॅस्पीटलमध्ये झाले आहेत तर ६ मृत्यू विष्णुपूरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाले आहेत. २ रूग्णांचा मृत्यू शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयात तर मुखेड देगलूर काेव्हिड रूग्णालयात प्रत्येकी १ तर हदगावमध्ये २ मृत्यू झाले आहेत. तिरूमला हाॅस्पीटलमध्ये दाेघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तराेडा येथील ७४ वर्षीय पुरूष व ५० वर्षीय महिला, श्रीनगर येथे ७३ वर्षीय पुरूष, नांदेड येथील ६० वर्षीय महिला, कलाल गल्ली येथील ७१ वर्षीय पुरूष, मरळक येथील ६१ वर्षीय पुरूष, भाेकर तालुक्यातील भाेसी येथील ४१ वर्षीय पुरूष, पाेलीस अधिक्षक कार्यालय परिसरातील ५५ वर्षीय महिला, तथागत नगरातील ६५ वर्षीय महिला, पांडूरंग नगर येथील ५२ वर्षीय महिला, मुदखेड तालुक्यातील पांगरगाव येथील ५५ वर्षीय महिला, गाडीपूरा येथील ५५ वर्षीय महिला, मुखेड तालुक्यातील जांभळी येथील ६५ वर्षीय पुरूष, हडकाे येथील ७५ वर्षीय महिला, तथागत नगर येथील ७० वर्षीय पुरूष, बळीरामपुर येथील ६० वर्षीय पुरूष, अर्धापूर तालुक्यातील लहान येथील ४५ वर्षीय पुरूष, नायगाव तालुक्यातील काेलंबी येथील ६१ वर्षीय पुरूष, सिडकाेतील ७२ वर्षीय पुरूष, आनंदनगर नांदेड येथील ७७ वर्षीय पुरूष, कंधार तालुक्यातील वरवंट येथील ५९ वर्षीय पुरूष, हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथील ७० वर्षीय महिला, हदगाव तालुक्यातील पारवा येथील ६२ वर्षीय महिला, देगलूर मधील जुना सराफा येथील ८४ वर्षीय महिला, नांदेड तालुक्यातील पुयणी येथील ७०वर्षीय पुरूष आणि साेमेश काॅलनी येथील ७८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
गुरूवारी १२२७ रूग्णांनी काेराेनावर मात केली त्यामुळे त्यांना घरी साेडण्यात आले आहे. त्यातील मनपा अंतर्गत ८२३ विष्णुपूरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ६, कंधार ६, किनवट १९, हिमायतनगर ३, अर्धापूर २३, जिल्हा रूग्णालय काेव्हिड हाॅस्पीटल २०, उमरी ३४, नायगांव ११, मुखेड ४५, देगलूर ३०, खाजगी रूग्णालय११४, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय ४, हदगाव १९, माहूर ८, बिलाेली ३२ आणि लाेहा तालुक्याअंतर्गत ३१ जणांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आज घडीला १० हजार ९७९ रूग्णांवर उपचार सुरू आहे. त्यातील १८१ जणांची प्रकृती अतिगंभीर आहे. उपचारानंतर बाधित रूग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ७६.६४ टक्क्यांवर पाेहाेचले आहे.