लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: शहरातील वसंतनगर भागात रुपा गेस्ट हाऊससमोर पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या कारने अचानक पेट घेतला़ त्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी अग्निशमन दलाला पाचारण केले़ काही वेळातच ही आग आटोक्यात आणण्यात आली़ ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली़वसंतनगर भागात असलेल्या रुपा गेस्ट हाऊसमोर महिंद्राची (एम़एच़२६- ५४४६) या क्रमाकांची कार उभी होती़ पहाटे दोन वाजेच्या सुमारास या कारमधून धूर निघत असल्याचे काही जणांच्या लक्षात आले़ त्यानंतर थोड्याच वेळात कारच्या समोरच्या भागाने पेट घेतला़ याबाबत नागरिकांनी लगेच अग्निशमन दलाला माहिती दिली़ काही वेळातच अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला व आग आटोक्यात आणली़सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही़, परंतु कारने पेट घेण्याचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही़ पोलिसांनीही घटनास्थळी भेट देवून पाहणी केली़ ही कार रामेश्वर गुलाबराव जाधव यांची असल्याची माहिती हाती आली आहे़
पार्र्किं गमधील कारने घेतला पेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:42 IST