शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

...तर प्रस्ताव रद्द करु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:27 IST

महापालिकेच्या वतीने डम्पिंग ग्राऊंडवर झाडे लावण्यात येणार आहे. याबाबत कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत. डम्पिंग ग्राऊंडवर झाडे येतील कसे? असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर या सर्व प्रकाराची माहिती घेऊन प्रस्तावात चुकीचे आढळल्यास तो रद्द करण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी मांडली आहे.

ठळक मुद्देचव्हाणांनी घेतली दखल : डम्पिंगवर वृक्षारोपणाचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिकेच्या वतीने डम्पिंग ग्राऊंडवर झाडे लावण्यात येणार आहे. याबाबत कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत. डम्पिंग ग्राऊंडवर झाडे येतील कसे? असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर या सर्व प्रकाराची माहिती घेऊन प्रस्तावात चुकीचे आढळल्यास तो रद्द करण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी मांडली आहे.महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहाने अमृत योजनेअंतर्गत हरित क्षेत्र विकासासाठी प्राप्त साडेचार कोटींच्या निधीतून शहरातील विविध भागात झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात चक्क जुन्या नांदेडातील देवीनगर येथील डम्पिंग ग्राऊंडच्या सात एकर जागेवरही झाडे लावण्याचा प्रस्ताव आहे. डम्पिंग ग्राऊंडवर झाडे येतील कसे? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत ‘लोकमत’नेही २८ फेब्रुवारीच्या अंकात वृत्त प्रकाशित करुन हा प्रस्ताव कोणत्या हेतूने पारित केला आहे? याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.बुधवारी याविषयी खा. चव्हाण यांच्याशी संवाद साधला असता या प्रस्तावाबाबत माहिती नसल्याचे सांगितले. असे काही असेल तर त्याबाबत माहिती घेऊ. चुकीचे काही असेल तर तो प्रस्ताव रद्द करु, असेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यारंभ आदेशही दिल्याचे सांगितले असता ते रद्द करणे कोणती मोठी बाब आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे एकूणच शहराला प्राप्त निधीच्या विनियोगाबाबत खा. चव्हाण यांनी लक्ष घातल्याचे स्पष्ट होत आहे.दरम्यान, या विषयात स्थायी समितीच्या काही सदस्यांनी उघड विरोध केला आहे. मात्र या विरोधाला डावलून कार्यारंभ आदेश देण्यात आले होते.इतकेच नव्हे, तर सर्वात कमी दर असलेल्या ठेकेदारास अपात्र ठरवत दुसºया क्रमांकाचे दर असलेल्या ठेकेदाराला हे काम बहाल करण्यात आले आहे.डम्पिंग ग्राऊंडवर लावण्यात येणाºया झाडांची संख्या आणि प्रत्यक्ष जागा याचाही कुठे ताळमेळ लागत नाही. दोन झाडांमधील अंतर किमान दोन फूट तरी असणे आवश्यक आहे.आता नाईकनगरबाबतही प्रश्नचिन्हडम्पिंग ग्राऊंडवरील झाडे लावण्याचा विषय चर्चेला आला असतानाच आता नव्याने नाईकनगर येथे जागेवर लावण्यात येणाºया झाडाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नाईकनगर येथील जागा एका बाजूने पूर्णत: मोकळी आहे. झाडे लावल्यानंतर त्या झाडांचे रक्षण कसे करायचे? कोण करणार? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. एकूणच हरित क्षेत्र विकासासाठीच्या साडेचार कोटींच्या निधीतून होणारी कामे ही वादातच सापडली आहेत. गोदावरी किनाºयावरील डंकीन पंपहाऊसवरही नैसर्गिकरित्या इतकी झाडे असताना नव्याने झाडे लावण्याचा प्रस्ताव महापालिकेने मंजूर केला आहे.