शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

बैलाला हाकलल्याने झाला राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:23 IST

कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू शहरातील शासकीय विश्रामगृहासमोर भरधाव वेगातील कारने दुचाकीस्वाराला दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना ६ ...

कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

शहरातील शासकीय विश्रामगृहासमोर भरधाव वेगातील कारने दुचाकीस्वाराला दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना ६ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली.

स्नेहनगर पोलीस कॉलनीतील रहिवासी ऋषिकेश बाबूराव मेथेवाड (२१) हा तरुण ६ सप्टेंबर राेजी रात्री १० वाजेच्या सुमारास एम.एच.२६, बीवाय ०९३७ या क्रमांकाच्या दुचाकीवरुन जात होता. त्याचवेळी मागाहून भरधाव वेगाने आलेल्या एम.एच.२६, एस १५६५ या क्रमांकाच्या कारने मेथेवाड यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मेथेवाड यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तानाजी नगरातून मुलाला पळविले

शहरातील तानाजी नगर भागातून एका अल्पवयीन मुलाला पळविण्यात आले. १ सप्टेंबर रोजी ही घटना घडली. आदर्श विलास भालेराव असे अल्पवयीन मुलाचे नाव आहे. गल्लीतील मित्राकडे जातो असे म्हणून तो घराबाहेर पडला होता. या प्रकरणात विमानतळ पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

छत्रपती चौकात फिरता बाजार पकडला

शहरातील छत्रपती चौक भागात सुरू असलेल्या फिरता बाजार या मटका अड्ड्यावर पोलिसांनी धाड मारली. ६ सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. यावेळी दहा हजार रुपये जप्त करण्यात आले असून या प्रकरणात भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

जिल्ह्यात तीन ठिकाणी दारू पकडली

जिल्ह्यात कुंडलवाडी, इतवारा आणि भोकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन ठिकाणी पोलिसांनी दारू पकडली. हुनगुंदा पेट्राेल पंपासमोर ११ हजार रुपयांची शिंदी दारू आणि ॲपे ऑटो पकडण्यात आला. शहरात पहिलवान टी हाऊस जवळ दीड हजारांची देशी दारू तर भोकर शहरात २ हजार ८०० रुपयांची दारू पकडली.