शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोरीत नांदेड दुसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 23:57 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जानेवारी महिन्यात कारवाई करत तब्बल १०० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये सर्वाधिक महसूल विभागातील कर्मचारी असून त्या पाठोपाठ पोलीस आणि प्रशासनाचा क्रमांक लागतो. सर्वाधिक १५ सापळे पुणे परिक्षेत्रात तर त्या पाठोपाठ नांदेड परिक्षेत्रात १३ सापळे टाकून कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देएका महिन्यात परिक्षेत्रात १३ जण जाळ्यातमहसूल, पोलीस पुढे

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जानेवारी महिन्यात कारवाई करत तब्बल १०० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये सर्वाधिक महसूल विभागातील कर्मचारी असून त्या पाठोपाठ पोलीस आणि प्रशासनाचा क्रमांक लागतो. सर्वाधिक १५ सापळे पुणे परिक्षेत्रात तर त्या पाठोपाठ नांदेड परिक्षेत्रात १३ सापळे टाकून कारवाई करण्यात आली.शासकीय कामासाठी लाच मागणाºया विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येते. मात्र त्यानंतरही या गुन्ह्यांच्या प्रमाणात कमी झालेली नसल्याचेच ही आकडेवारी सांगते. जानेवारी २०१८ मध्ये राज्यात लाचलुचपत विभागाच्या वतीने ७९ सापळे रचण्यात येऊन १०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सापळ्यांमध्ये महसूल विभागाशी संबंधित १९, पोलीस आणि पंचायत समिती विभागाचे प्रत्येकी १६, वीज वितरण कंपनीचे ६, वन विभाग ४, जिल्हा परिषद आणि आरोग्य विभाग प्रत्येकी ३, सहकार, नगरपरिषद, कृषी आणि बांधकाम विभाग प्रत्येकी २ तर महानगरपालिका, शिक्षण, जलसंपदा, अन्न व औषध प्रशासन या विभागांतील प्रत्येकी एक कारवाईचा समावेश आहे.या ७९ सापळ्यांच्या प्रकरणांमध्ये राज्यात तब्बल १ कोटी ९१ लाख ७ हजार इतकी रक्कम जप्त करण्यात आली असून या कारवाईत वर्ग-१ च्या ५ तर वर्ग-२ च्या ८ अधिकाºयांचाही समावेश आहे. कारवाई झालेल्यामध्ये तृतीय श्रेणीतील तब्बल ६५ कर्मचारी असल्याचेही आकडेवारीवरुन स्पष्ट होते. परिक्षेत्रनिहाय कारवाईची आकडेवारी पाहिली असता सर्वाधिक १५ सापळे पुणे परिक्षेत्रात लावण्यात आले असून त्या पाठोपाठ १३ सापळे नांदेड परिक्षेत्रात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावले. अमरावतीमध्ये १२, ठाणे ११, नागपूर १०, नाशिक ८, औरंगाबाद ६ तर मुंबई परिक्षेत्रात जानेवारी महिन्यामध्ये ४ सापळे रचून लाचखोरांवर कारवाई करण्यात आली.लोकसेवकांसह खाजगी व्यक्तीही जाळ्यातलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने जानेवारी २०१८ मध्ये लाचखोरीच्या ७९ प्रकरणामध्ये कारवाई करीत १०० अधिकार-कर्मचाºयांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात ९ लोकसेवक आणि ९ खाजगी व्यक्तींचाही समावेश आहे. अपसंपदा प्रकरणांची माहिती घेतली असता जानेवारी महिन्यात अपसंपदेचे राज्यात ४ प्रकरणे दाखल झाली आहेत. यात वर्ग-१, वर्ग-२ व वर्ग-३ च्या प्रत्येकी एका कर्मचाºयाचा समावेश असून एका लोकसेवकासोबतच चार खाजगी व्यक्तींविरुद्धही अपसंपदाप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.