शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेक द चेन,' आरटीओ' कार्यालय ३० एप्रिलपर्यंत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:18 IST

नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यास्तव प्रतिबंधात्मक तथा खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने वेळोवेळी निर्देश जारी केले आहेत. ...

नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यास्तव प्रतिबंधात्मक तथा खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने वेळोवेळी निर्देश जारी केले आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयातील शिकाऊ अनुज्ञप्ती तथा 'लर्निंग' लायसन्स, पक्की अनुज्ञप्ती चाचणी अर्थातच 'परमनंट' लायसेन्सची टेस्ट आदी कार्यालयीन कामकाज नियंत्रित केले, तरी गर्दी रोखणे सद्याच्या परिस्थितीत शक्य होत नाही. दरम्यान, जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जिल्ह्यात कलम १४४ लागू केलेले असून, त्यानुसार पाचपेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र फिरण्यास तथा एकत्र जमा होण्यास प्रतिबंधित केले आहे. आरटीओ कार्यालयात दैनंदिन कामकाजासाठी येणाऱ्या अर्जदारांची संख्या अधिक असल्याने जमावबंदी आदेशाचेही उल्लंघन होत असल्याचे परिवहन अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. तर सद्य:परिस्थितीत नांदेडच्या आरटीओ कार्यालयात कार्यरत २० अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाली आहे. या परिस्थितीस वेळीच प्रतिबंध नाही केल्यास, कार्यालयातील उर्वरित अधिकारी तथा कर्मचाऱ्यांनाही संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, मुख्य सचिव, महसूल व वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन, मुंबई तसेच अपर परिवहन आयुक्त, म.रा. मुंबई, आणि नांदेड येथील जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ७ एप्रिल ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीत प्रादेशिक परिवहन कार्यालयातील खटला विभाग व आस्थापना विभाग वगळता कार्यालयातील संपूर्ण दैनंदिन कामकाज बंद करण्यात येत आहे.

ज्यांनी शिकाऊ (लर्निंग) व पक्की (परमनंट लायसेन्स) अनुज्ञप्तीसाठी अपॉईंटमेंट घेतल्या आहे, त्यांनी त्या अपॉईंटमेंट रद्द करून आपले सोईप्रमाणे पुन्हा नवीन अपॉईंटमेंट घ्याव्यात. जुनी अपॉईंटमेंट रद्द करणे व पुन्हा नवीन अपॉईंटमेंट घेणे, ही प्रक्रिया ऑनलाइन असून, त्याकरिता पुन्हा कोणतेही 'अतिरिक्त शुल्क' आकारले जात नाही. ३० एप्रिलनंतर कार्यालय तत्कालीन शासन निर्णयानुसार कार्यरत असेल. - शैलेश कामत, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड.