शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाच्या अभिनंदनासह बीओटी पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:16 IST

शहराच्या विकासात भर पाडणारा बीओटी प्रोजेक्ट सभागृहापुढे ठेवला असून यापूर्वी २ कोटी रुपये प्रिमीयम मिळाला असताना तब्बल ३ कोटींचा जादा प्रिमीयम मिळवून देत महापालिकेचे उत्पन्न वाढविल्यामुळे प्रशासनाच्या अभिनंदनाचा ठराव करत शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बीओटीसह १३ प्रस्ताव पास-पासच्या गजरात मंजूर करण्यात आले.

ठळक मुद्देसर्वसाधारण सभा पाणीपुरवठा, मराठा आरक्षण, पथदिव्यांच्या विषयावर जोरदार चर्चा

नांदेड : शहराच्या विकासात भर पाडणारा बीओटी प्रोजेक्ट सभागृहापुढे ठेवला असून यापूर्वी २ कोटी रुपये प्रिमीयम मिळाला असताना तब्बल ३ कोटींचा जादा प्रिमीयम मिळवून देत महापालिकेचे उत्पन्न वाढविल्यामुळे प्रशासनाच्या अभिनंदनाचा ठराव करत शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बीओटीसह १३ प्रस्ताव पास-पासच्या गजरात मंजूर करण्यात आले.महापौर शीलाताई भवरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यावेळी शहरातील वजिराबाद भागातील तरोडेकर मार्केटचा बीओटीच्या तत्त्वावर विकास करण्याची निविदा तसेच अन्य १२ प्र्रस्ताव ठेवण्यात आले. हे प्रस्ताव कोणत्याही चर्चेविना पास-पासच्या गजरात मंजूर करण्यात आले. बीओटी विषयावर सभागृहात बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या महेश कनकदंडे यांनाही सभागृहात इतर सदस्यांनी शांत केले. आवश्यक ती माहिती लेखी स्वरुपात कनकदंडे यांना द्यावी, अशी टिप्पणी करत त्यांना शांत करण्यात आले. त्याचवेळी या प्रस्तावाबद्दल माजी महापौर अब्दुल सत्तार यांनी प्रशासनाचे अभिनंदन केले. दरम्यान, व्यंकटराव तरोडेकर मार्केटचे नाव बदलू नये, अशी मागणी नगरसेवक सतीश देशमुख यांनी केली. तब्बल ३ कोटींचे जादा उत्पन्न महापालिकेला प्राप्त झाले आहे. त्याचवेळी हा प्रोजेक्ट शहराच्या विकासात भरच पाडणार असल्याचे ते म्हणाले.दरम्यान, सभेच्या प्रारंभी मराठा आरक्षण मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव विरोधी पक्षनेत्या गुरुप्रितकौर सोडी, बालाजी कल्याणकर, दीपक रावत यांनी ठेवला. या प्र्रस्तावावर सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, उपमहापौर विनय गिरडे, माजी महापौर अब्दुल सत्तार, शेर अली आदींनी पाठिंबा दिला. त्याचवेळी ४० बळीनंतर हे आरक्षण मिळाले असल्याचे सांगत याबरोबरच मुस्लिम आणि धनगर आरक्षणाचाही प्रश्न सोडविण्याची मागणी करण्यात आली.पाणीप्रश्नासंदर्भात आ. हेमंत पाटील यांनी खा. चव्हाणांवर आरोप केल्याप्रकरणी सभागृहात हेमंत पाटील यांचा निषेध करण्यात आला. शहरवासियांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असताना केवळ राजकारणासाठी वेगवेगळ्या घोषणा करुन ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांमध्ये वाद निर्माण केला जात असल्याचेही अब्दुल सत्तार म्हणाले. बापूराव गजभारे यांनीही हेमंत पाटील यांच्यासह आ. प्रताप पाटील यांच्या पाणीविषयक भूमिकेचा निषेध केला. शेतकºयांना पाणी मिळणे आवश्यक आहे. त्याचवेळी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणेही आवश्यक असल्याचे गजभारे म्हणाले. एकीकडे पाणीप्रश्न गंभीर होत असतानाच शहरात मात्र मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती व पाण्याचा अपव्यय सुरु असल्याचा मुद्दा किशोर स्वामी यांनी मांडला. पाणी नियोजनाबाबत माहिती देण्याची मागणीही त्यांनी केली. शहरात अनेक भागात पाणी वाया जात असल्याचा ठराव संगीता डक, दीपक रावत यांनी मांडला.पाण्याच्या नियोजनाबाबत आयुक्त लहुराज माळी यांनी विष्णूपुरी प्रकल्पातील पाणीचोरी प्रकरणात जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात असल्याचे ते म्हणाले. पाणी पथकालाही सक्रिय होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणात अनधिकृत बॅनर, होर्डिंग्ज लावण्यात आले असून याकडे दुुर्लक्ष का करण्यात येत आहे ? या प्रकरणात क्षेत्रीय अधिकाºयांची जबाबदारी निश्चित करुन त्यांच्यावर कार्यवाही करावी, अशी मागणी सभागृह नेते गाडीवाले यांनी केली. शहरातील विविध भागातील अनधिकृत बॅनर, होर्डिंग्जचे छायाचित्र आयुक्तांकडे सादर केले. या प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याचे आदेश अधिकाºयांना दिले. शहरात कच-याचे विलगीकरण न करता कचरा उचलला जात असताना नागरिकांवर मात्र कारवाईचा इशारा दिला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्या सोडी यांनी केला.कचरा विलगीकरणाची व्यवस्था ठेकेदाराने केली नसल्याचे त्या म्हणाल्या. वजिराबाद भागात एका महिला मजुराचा मृत्यू झाला. या प्रकरणात प्रशासनाने काय कारवाई केली ? असा सवाल उपस्थित केला. या प्रश्नावर सदर महिला मजुराच्या मृत्यूबाबत माहिती प्रशासनाकडे नसल्याचे स्वच्छता विभागाच्या उपायुक्त गीता ठाकरे यांनी सांगितले. त्यावर विरोधी पक्षनेत्यांनी संतप्त भावना व्यक्त करत मजुराच्या मृत्यूनंतर प्रशासन कारवाई करत नाही, ही बाब गंभीर असल्याचे सांगितले. पथदिव्यांचा विषयही ऐरणीवर आला होता. अनेक भागात अंधार आहे. निवडून येऊन वर्ष झाले तरी हा प्रश्नही नगरसेवक सोडवू शकले नाहीत. प्रभागातील नागरिक आमच्याकडे येत असून त्यांना काय उत्तर द्यायचे, अशी विचारणा ज्योती कल्याणकर यांनी केली. सिडको भागातही अंधार असल्याचे बेबीताई गुपिले यांनी तर तरोडा भागातील पथदिव्यांचा प्रश्न सतीश देशमुख यांनी मांडला. कौठा भागात कोणत्याही सुविधा नसून प्रशासन कधी लक्ष देणार, अशी विचारणा शांताबाई गोरे यांनी केली.

  • स्थायी समितीची शुक्रवारी सकाळी ११ वाजता होणारी सभा अचानक पुढे ढकलण्यात आली. ही सभा आता शनिवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. दलित वस्ती निधीच्या कामांना मंजुरीचे प्रस्ताव सभेपुढे आहेत. बीओटीच्या विषयावरुन स्थायी समितीने आपल्या अधिकाराचा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत स्थायी समिती सदस्यांनी चुप्पीच साधली होती. शनिवारी होणा-या सभेत बीओटीवर चर्चा होईल का ? हा प्रश्न पुढे आला आहे. निवृत्त झालेल्या आठ सदस्यांची ही शेवटची बैठक राहणार आहे.
टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका