महाविरतण व महापारेषण परिमंडळात तीन वर्षांपासून शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. प्रा. संतोष देवराये यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याला उजाळा दिला. दरम्यान, डाॅ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या साहाय्याने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ६४ कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून अभिवादन केले. यावेळी कार्यकारी अभियंता जे. एल. चव्हाण, ॲड. शैलेंद्र पाटील, ताैसिफ पटेल यांची उपस्थिती होती. कार्यकारी अभियंता स्नेहा हंचाटे यांनी सूत्रसंचालन केले, तर डोणगावकर यांनी आभार मानले.
नांदेड : शिवजन्मोत्सवानिमित्त नवा मोंढा व्यापारी मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर व अन्नदानाचे वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली. कोराेना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करीत कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, नवामोंढा नांदेड येथे व्यापारी मित्रमंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव निमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यावेळी आ. बालाजीराव कल्याणकर, जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील-बोंढारकर, दत्ता पाटील कोकाटे, उमेश मुंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजीराव पुयड, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, विठ्ठल डख, आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सदाशिवराव तरोडेकर, प्रल्हादराव पाटील-कांकाडीकर, बालाजी पाटील दर्यापूरकर, विठ्ठलराव देशमुख, सचिन पाटील नेरलीकर, मुन्नसेठ आडे, कृष्णा सावकार, आदींनी परिश्रम घेतले.
नांदेड : रिपब्लिकन सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माधव जमदाडे, मधुकर झगडे, पांडुरंग शिंदे, धनंजय मांजरमकर, गाैतम जोंधळे, सोनकांबळे, डाॅ. मा. म. गायकवाड, यशवंतराव ढगे, प्रा. अशोक जाधव, प्रकाश जमदाडे, एन. जी. साेनकांबळे, आदींची उपस्थिती होती.