शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना आरक्षणाची भाजपाची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:18 IST

महिलांना पहिल्यांदा ३३ टक्के आरक्षण देण्याची भूमिका भाजपाने आपल्या पक्षात घेतली होती़ त्यानंतर संसद व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण महिलांना मंजूर झाले़ ते आरक्षण आता ५० टक्के करण्यासाठी भाजपा तयार असून इतर पक्ष मात्र त्यासाठी तयार नसल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड:महिलांना पहिल्यांदा ३३ टक्के आरक्षण देण्याची भूमिका भाजपाने आपल्या पक्षात घेतली होती़ त्यानंतर संसद व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण महिलांना मंजूर झाले़ ते आरक्षण आता ५० टक्के करण्यासाठी भाजपा तयार असून इतर पक्ष मात्र त्यासाठी तयार नसल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली़भाजपाच्या महिला प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप सोमवारी नांदेडमध्ये झाला़ यावेळी मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष दानवे बोलत होते़ अध्यक्षस्थानी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड़ माधवी नाईक तर प्रदेश महामंत्री आ़ सुजितसिंह ठाकूर, माजी प्रदेशाध्यक्ष किरणताई महल्ले यांची प्रमुख उपस्थिती होती़ दानवे यांनी देशात आता फक्त भाजपाची चलती असल्याचे सांगताना केंद्रासह १३ राज्यात भाजपाचे आणि ४ राज्यात भाजपा आघाडीचे सरकार असल्याचे सांगितले़ त्यामुळे पक्षाचा जनाधार दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगत राज्यातही महिलांना भाजपामध्ये काम करण्यासाठी पुढे आले पाहिजे़ यासाठी पदाधिकाºयांनी पक्षाची ध्येयधोरणे, योजना लोकांपर्यंत पोहोचवावी असे आवाहनही त्यांनी केले़ देशात पहिल्यांदा भाजपामध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यात आले़ त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा तसेच संसदेतही आरक्षण दिले़ भाजपा महिला आरक्षणात आणखी एक पाऊल टाकण्यास तयार असल्याचे ते म्हणाले़यावेळी प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड़ नाईक यांनी महिलांचे संघटन करण्यात अडचणी असल्या तरी भाजपा महिला मोर्चा दोन स्तरावर काम करीत असल्याचे सांगितले़ महिलांचे संघटन आणि सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम महिला मोर्चा करीत आहे़ आगामी काळात पक्ष संघटन वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या़ समारोपप्रसंगी जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, शहराध्यक्ष संतुकराव हंबर्डे, भाऊराव देशमुख, महिला मोर्चाच्या अध्यक्षा डॉ़ शितल भालके, धनश्री देव, शोभा वाघमारे, अरूंधती पुरंदरे, जि़प़ सदस्या डॉ़ मिनल खतगावकर,वंदना कुलकर्णी, महादेवी मठपती, शततारका पांढरे, गायत्री लकडे आदींची उपस्थिती होती़