महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘सेवा ही संघटन’ या उपक्रमांतर्गत कोरोना संक्रमणाच्या काळात गरजूंना शक्य तितकी मदत करण्याचे आदेश दिले आहेत. नांदेड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे अनेक रुग्ण उपचारासाठी शहरात येत आहेत. संचारबंदी असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची गैरसोय होत असल्यामुळे खासदार चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड शहरातील विविध रुग्णालयांत असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना दररोज भाजी-पोळी, वरण-भात असलेला स्वादिष्ट डबा मोफत देण्यात येणार आहे. दररोज शासकीय रुग्णालय विष्णुपुरी, श्री गुरुगोविंदसिंघजी रुग्णालय शिवाजी पुतळा, आयुर्वेदिक रुग्णालय, बोरबन परिसर, डॉक्टर लेन परिसर तसेच वाडिया फॅक्टरी परिसर येथील रुग्णांना दिलीप ठाकूर यांच्या वितरण व्यवस्थेखाली भाजपचे पदाधिकारी जेवणाच्या डब्यांचे वाटप करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रुग्णांच्या नातेवाइकांसाठी भाजपचा ‘आधार गरजूंचा’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:17 IST