झोपलेल्या तरुणाचा मोबाइल लंपास
शहरातील पंचशीलनगर भागात घराबाहेर झोपलेल्या एका तरुणाचा मोबाइल लंपास करण्यात आला. ही घटना ४ जून रोजी घडली. बजरंग बाबूराव जोंधळे हा तरुण पंचशीलनगर भागात घरासमोर अंगणात झोपला होता. यावेळी त्याच्या खिशातील १८ हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरट्याने लांबविला. या प्रकरणात इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
किरकोळ कारणावरून जबर मारहाण
शहरातील चिरागगल्ली भागात ऑटोला दगड लागल्याच्या कारणावरून गोविंद दिलीपसिंग दीक्षित या तरुणाला मारहाण करण्यात आली. ही घटना ३ जून रोजी घडली. याप्रकरणात इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मुलगा घरी आल्याने झाला वाद
तालुक्यातील काकांडी शिवारात मुलाकडे राहायला आलेल्या वडिलाला मारहाण करण्यात आली. ही घटना ४ जून रोजी घडली. शंकर महादजी बकाल हे शेतातून तिसरा मुलगा असलेल्या शिवाजी यांच्या घरी राहायला आला होता. यावेळी वाद घालून त्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
हॉटेलच्या शेजारी जुगार अड्डा
लोहा शहरातील शिवनेरी हॉटेलच्या शेजारी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड मारली. यावेळी कल्याण नावाचा मटका सुरू होता. पोलिसांनी रोख दीड हजार रुपये जप्त केले. तरकंधार तालुक्यातील मौजे वरवंट येथून तिर्रट खेळत असलेल्या आरोपीकडून १ लाख ३६ हजारांचे साहित्य जप्त केले.