शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भोंदूबाबासह सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:03 IST

पत्नीला झालेली बाहेरबाधा घालण्यासाठी भोंदूबाबाच्या मदतीने पत्नीच्या डोक्यावर लिंबू कापणा-या बाबासह सासरच्या मंडळीविरोधात जादुटोणा विरोधी कायद्याप्रमाणे भाग्यनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याप्रकरणी पीडित महिलेने तक्रार दिली आहे़

ठळक मुद्देजादूटोणा : मंत्र मारुन विवाहितेच्या डोक्यावर लिंबू कापले

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : पत्नीला झालेली बाहेरबाधा घालण्यासाठी भोंदूबाबाच्या मदतीने पत्नीच्या डोक्यावर लिंबू कापणा-या बाबासह सासरच्या मंडळीविरोधात जादुटोणा विरोधी कायद्याप्रमाणे भाग्यनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याप्रकरणी पीडित महिलेने तक्रार दिली आहे़शहरातील स्नेहनगर वसाहतीत राहणा-या या फिर्यादी महिलेचा २०१३ मध्ये औरंगाबाद येथील तरूणाशी विवाह झाला़ यानंतर जवळपास आठ महिने त्यांचा संसार सुरळीत चालला़ त्यातच सदर महिलेच्या स्वभावात, वागण्यात बदल झाल्याची तक्रार पतीसह सासरच्या मंडळींकडून करण्यात येऊ लागली. यातूनच पतीसह सासरच्या मंडळींनी विवाहितेला दाखविण्यासाठी एका वैद्य बाबाकडे नेले.बाबानी विवाहितेला पाहून तिला बाहेरची बाधा झाली असून मी सांगितल्याप्रमाणे करा, असे सूचवित लिंबू, अंगारा देवून मंत्र मारला. मात्र बाबांच्या या कृत्यानंतर सदर विवाहित महिलेची प्रकृती अधिकच बिघडली. प्रकृती खालावल्याने सदर महिलेला औरंगाबादवरुन नांदेड येथे माहेरी आणून सोडण्यात आले. दरम्यान, २१ जानेवारी रोजी महिलेचा पती, सासु, सासºयांनी बाबाला सोबत घेवून नांदेड येथील फिर्यादी महिलेच्या डोक्यावर लिंबू कापून मंत्रोच्चार केले़ तसेच जीवे मारण्याची धमकी देवून निघून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे़ याप्रकरणी फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून भाग्यनगर ठाण्यात सासरची मंडळी आणि बाबावर जादुटोणा विरोधी कायदा कलम ३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जी़ एस़ गोटके हे तपास करीत आहेत़