शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

भोकरमध्ये उड्डाणपुलाखालचे अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 23:54 IST

शहरातील प्रमुख रस्त्यावर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाखाली बस्तान मांडून दुकाने थाटून केलेले अतिक्रमण काढण्याची मोहीम नगरपरिषदेने शुक्रवारी केली.

ठळक मुद्दे रेल्वेलाईनवर उड्डाणपूल व भुयारी मार्ग करण्याचे काम सुरु शहराचे सौंदर्य, स्वच्छता आणि रहदारीचा प्रश्न

भोकर : शहरातील प्रमुख रस्त्यावर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाखाली बस्तान मांडून दुकाने थाटून केलेले अतिक्रमण काढण्याची मोहीम नगरपरिषदेने शुक्रवारी केली.शहराच्या अंतर्गत विकासासाठी मजबूत रस्ते, नाली विकासाची कामे हाती घेवून मागील दोन वर्षांपूर्वी शहरातून जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावरील रेल्वेलाईनवर उड्डाणपूल व भुयारी मार्ग करण्याचे काम सुरु आहे. सदरील काम सध्या प्रगतीपथावर आहे. यात रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूने उड्डाणपूल निमार्णाधीन आहे. तयार होत असलेल्या या पुलाखाली व्यावसायिकांनी हातगाडे, चहाचे गाडे, पानटपरी आणि खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय सुरु करुन अतिक्रमण केले होते. यामुळे शहराचे सौंदर्य, स्वच्छता आणि रहदारीचा प्रश्न निर्माण होवून विकासकामात अडथळा निर्माण होत होता. तर निमार्णाधीन उड्डाणपुलाखाली बांधकामाचे साहित्य पडण्याचा आणि त्यामुळे अनपेक्षित अपघात होण्याचा धोका निर्माण झाला होता.झालेले अतिक्रमण निघाल्याने उड्डाणपुलाखालची जागा मोकळी झाली असून यामुळे तयार होणाºया अस्वच्छतेला आळा बसल्याने शहरवासियांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. तर पुलाखालील अतिक्रमण निघाले मात्र, शहरातील मुख्य रस्त्यावरील पादचारी मार्गावर मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमणाकडे नगरपालिकेचा मोर्चा कधी वळणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. उड्डाणपुलाखाली असलेले काही साहित्य जप्त करण्यात आले.सुरुवातीला काही दुकानदारांनी दुकाने थाटल्यानंतर दिवसेंदिवस अतिक्रमणात वाढ होत होती. याबाबत व्यावसायिकांना आपली अतिक्रमणे स्वत: काढून घेण्याच्या सूचना नगरपरिषदेने तोंडी व ध्वनिक्षेपाद्वारे वारंवार केली होती. तरीही अतिक्रमण निघत नसल्यामुळे अखेर पालिका कर्मचाºयांच्या पथकाने सदरील अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविली.

टॅग्स :NandedनांदेडEnchroachmentअतिक्रमणroad safetyरस्ते सुरक्षा