भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील विविध ठिकाणी पंचशील ध्वजवंदन आणि सायंकाळी पणती ज्योत मिरवणूक काढून महामानवाला अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी साडेनऊ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेवर भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा भोकरचे अध्यक्ष भीमराव दुधारे यांच्या हस्ते पंचशील ध्वजवंदन होणार आहे. त्यानंतर लगेच सकाळी दहा वाजता प्रवचन लोखंडे निर्मित स्वरांगण प्रस्तुत ‘भीम स्वरांजली’ भीमबुद्ध गीतांची मैफल रंगणार आहे. या मैफलीत बाबूराव पाटील, प्रवचन लोखंडे, गायक धम्मानंद जाधव, बालगायक संकल्प जाधव, गायिका उषा गायकवाड, प्रा.राहुल कदम यांचा सहभाग राहणार आहे. परिसरातील जनतेने या सोहळ्याला उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
भोकरला महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीम स्वरांजली कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:28 IST