शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सिंदगीत अस्वलाला विहिरीबाहेर काढण्यात मिळाले यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 00:16 IST

पाण्याच्या शोधात आलेले अस्वल विहिरीत पडल्याची घटना २० जानेवारी रोजी सिंदगी येथे घडली. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर अस्वलाला बाहेर काढण्यात यश आले. तब्बल पाच तासांनंतर अस्वलाला बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कबोधडी (ता. किनवट) : पाण्याच्या शोधात आलेले अस्वल विहिरीत पडल्याची घटना २० जानेवारी रोजी सिंदगी येथे घडली. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर अस्वलाला बाहेर काढण्यात यश आले. तब्बल पाच तासांनंतर अस्वलाला बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु झाली.त्यानंतर तीन तासांनी विहिरीतील अस्वलाला बाहेर काढण्यात वनविभागाच्या अधिका-यांनी यश आले. सिंदगी येथे सकाळी नऊ वाजता पाण्याच्या शोधात आलेले अस्वल शेतकरी इंदल भिकू चव्हाण यांच्या शेतातील विहिरीत पडले. ही बाब शेतक-याच्या निदर्शनास येतास त्यांनी वन कर्मचा-यांना कळविले. वनपरिक्षेत्र अधिकारी एम. एम. जोगदंड हे दुपारी दोन वाजता घटनास्थळी हजर झाले. तत्पूर्वी बोधडी वन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. प्रारंभी वन विभागाच्या कर्मचा-यांनी व नागरिकांनी जाळीच्या सहाय्याने अस्वलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, वर काढताना अस्वल पुन्हा विहिरीत पडून त्याच्या तोंडाला मार लागला. तोंडातून रक्तस्त्रावही होत होता. पुन्हा जाळी टाकून अस्वलाला बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान, पिंज-यात टाकत असताना अस्वलाने झटका देवून जंगलात पळ काढला. तो पुन्हा काही हाती लागला नाही.