शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: मोदी यांनी दहशतवादाविरूद्धचे धोरण जगासमोर ठेवले- राजनाथ सिंह
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही प्रशासनाचा शेतजमिनीवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:18 IST

शहरातील असर्जन परिसरात गोपीचंद लुटे यांची शेतजमीन असून, प्रशासकीय इमारतींसाठी ही जमीन प्रशासकीय इमारतींसाठी प्रशासनाने संपादित करण्याचा प्रयत्न सन ...

शहरातील असर्जन परिसरात गोपीचंद लुटे यांची शेतजमीन असून, प्रशासकीय इमारतींसाठी ही जमीन प्रशासकीय इमारतींसाठी प्रशासनाने संपादित करण्याचा प्रयत्न सन २०११पासून सुरू आहे. परंतु गोपीचंद लुटे यांच्या मालकीची गट नं. ११७, ११८, ११९ मधील २२ एकर ही एकमेव जमीन असून, ही जमीन भूसंपादन केल्यानंतर त्यांच्यावर भूमिहीन होण्याची वेळ येत असल्याने त्यांनी या प्रकरणात न्यायालयात दावा केलेला असून, याचा निकाल प्रलंबित आहे. याची जाणीव असतानाही प्रशासनाने आज पोलिसांच्या मदतीने जमिनीवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे जमीन मोजणी किंवा ताबा करण्याबाबतची कोणतीही नोटीस न देता प्रशासन ताबा मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याने शेतकरी गोपीचंद लुटे व त्यांचे कुटुंबीय चांगलेच संतापले होते. यावेळी तहसीलदार किरण अंबेकर यांनी घटनास्थळी येऊन शेतकर्‍यांची बाजू ऐकून घेत जमिनीवर ताबा घेण्याचा निर्णय मागे घेत न्यायालयाचा आदेश येईपर्यंत प्रतीक्षा करणार असल्याचे आश्वासन शेतकर्‍यांना दिले.

दरम्यान, जमिनीचा वाद न्यायालयात प्रलंबित असून, आज यावर सुनावणी सुरू आहे. प्रशासनाने परस्पर निवाडे करून जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. प्रशासन करत असलेला हा प्रकार चुकीचा असून, भूसंपादन प्रक्रियेची कुठलीही नोटीस आम्हाला देण्यात आली नसल्याचे शेतकरी गोपीचंद लुटे यांनी सांगितले.