तिचा शारीरिक छळ केला. २७ जुलै, २०२० रोजी विवाहिता डॉ.सुरेखा या वॉशरूमला गेल्या असता, पती शैलेश गडलवाड, सासू शिवकांता गडलवाड, सासरा गणपत गडलवाड, दीर शुभम गडलवाड, सुभद्रा गडलवाड, सोनी गडलवाड, अर्चना गडलवाड, सुप्रिया चुकेवाड, अनिता वरगंडे, सुनील वरगंडे यांनी संगनमत करून जबर मारहाण केली. यावेळी पतीने गळा दाबून भिंतीवर, तसेच फरशीवर आपटून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार विवाहिता सुरेखा गडलवाड यांनी दिली. या तक्रारीवरून भाग्यनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक ए.एल. घाटे करीत आहेत. अन्य एका घटनेत लोहा येथे एका विवाहितेला सासरच्या मंडळींनी माहेराहून ५ लाख रुपये आणण्याची मागणी करत मारहाण केली. यावेळी आई-वडील समजावण्यासाठी आले असता, त्यांनाही मारहाण केल्याची तक्रार भाग्यनगर ठाण्यात करण्यात आली आहे. लोहा येथे रागिनी संतोष झगडे या विवाहितेला सासरच्या मंडळींनी माहेराहून गाडी घेण्यासाठी पाच लाखांची मागणी केली. ही मागणी पूर्ण न झाल्याने पती संतोष झगडे, इरवंत झगडे, अनुसया झगडे, संदीप झगडे, सुनीता कांबळे, साधना झगडे, संगीता परतवार, विशाल परतवार यांनी शारीरिक छळ करून मारहाण केली,
अशी तक्रार विवाहिता रागिनी झगडे यांनी भाग्यनगर ठाण्यात दिली. या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.