दरम्यान, हदगाव उपजिल्हा रुग्णालयात जाधव यांना दाखल करण्यात आले. पण प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. रविवारी त्यांच्या जबाबावरून मनाठा पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, फिर्यादी हे १५ मे रोजी सायंकाळी ६ वाजता तक्रार देण्यासाठी आले होते. मात्र आज वेळ लागेल, उद्या या असे त्यांना सांगण्यात आले. एमएलसी आली नव्हती, असे सपोनि विनोद चव्हाण यांनी सांगितले. जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन पोलिसांना जवाब नोंदवता आला असता, मात्र तसे घडले नाही. एवढा राडा होऊनही मनाठा पोलीस अनभिज्ञ कसे काय, असा सवाल फिर्यादीच्या नातेवाईकांनी केला. वाढदिवसानिमित्त काहीजण तलवारीचा वापर करून गावात दहशत पसरविण्याचा उद्योग करीत असल्याचे दिसून येत आहे.
पैशाच्या कारणावरून तलवारीने हल्ला, एकाची प्रकृती गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:16 IST