शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उसने पैसे परत मागितल्याने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:13 IST

शिवनगरात घरफोडी, ९० हजारांचा ऐवज लंपास नांदेड- शहरातील शिवनगर येथील नुरी चौकात घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी ९० ...

शिवनगरात घरफोडी, ९० हजारांचा ऐवज लंपास

नांदेड- शहरातील शिवनगर येथील नुरी चौकात घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी ९० हजारांचा ऐवज लंपास केला. नुरी चौकातील समरीन बेगम शकील खान या आपल्या भावाच्या घरी गेल्या होत्या. चोरट्यांनी संधी साधून घराचे कुलूप तोडून सोमवारी रात्री ९० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. विमानतळ ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

इम्रान कॉलनीतून दुचाकी लंपास

नांदेड - जुन्या नांदेडातील देगलूरनाका भागातील इम्रान कॉलनी येथे घरासमोर उभी केलेली (एमएच २६- ए.एम- ७४११) क्रमांकाची दुचाकी चोरट्यांनी सोमवारी रात्री चोरून नेली. मोहमद मोईन यांनी याप्रकरणी तक्रार दिली. इतवारा ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

नांदेड- धर्माबाद तालुक्यातील पाटोदा बु. येथे महादेवी लक्ष्मण मोताचे (वय २३) या महिलेने मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी इरवंत इळेगावे यांनी दिलेल्या माहितीवरून धर्माबाद ठा्ण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

विहिरीत उडी मारुन आत्महत्या

नांदेड- हदगाव येथील बुद्ध भूमी वसाहतीत राहणाऱ्या विनोद बंडू खंदारे (वय ४०) या व्यक्तीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. अज्ञात कारणावरून त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. संदीप खंदारे यांनी या घटनेप्रकरणी हदगाव ठाण्यात माहिती दिली होती.