शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीस नवी उभारी देण्यासाठी प्रयत्न करणार -अशोकराव चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:24 IST

शहरातील व्यंकटेशनगर भागातील मराठवाडा खादी ग्रामोद्योग कार्यालयास सोमवार, १६ ऑगस्ट रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सदिच्छा भेट दिली ...

शहरातील व्यंकटेशनगर भागातील मराठवाडा खादी ग्रामोद्योग कार्यालयास सोमवार, १६ ऑगस्ट रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सदिच्छा भेट दिली आहे. यावेळी मराठवाडा खादी ग्रामोद्योगाचे ईश्‍वरराव भोसीकर, हंसराज वैद्य, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर, काँग्रेसचे प्रवक्ता संतोष पांडागळे आदी उपस्थितीत होते.

यावेळी मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे ईश्‍वरराव भोसीकर यांनी राष्ट्रध्वज निर्मिती केंद्रात तयार होणारा तिरंगा ध्वज देशातील १६ राज्यांत पाठविण्यात येत असल्याचे सांगितले. या समवेतच मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीच्या अन्य प्रश्‍नांकडेही लक्ष वेधले.

याप्रसंगी पालकमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले, यंदाचे वर्ष देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. या वर्षाच्या निमित्ताने ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे पुनर्जीवितासाठी राज्य शासनाकडून मदत करण्यात येईल. या संस्थेतील बंद पडलेले उपक्रम सुरू करण्यासाठी पालकमंत्री या नात्याने संपूर्ण मदत मिळवून देण्याचा शब्द दिला. या वास्तूचे जुने रूप कायम ठेवून इमारतींना बळकटी देण्यासंदर्भात कायम करता येईल याबाबतचा अहवाल १५ दिवसांत सादर करावा, असे निर्देश ना. चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.