शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

अर्जापूर पाणी योजनेचा श्रीगणेशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 23:53 IST

राज्य शासनाच्या जलस्वराज्य प्रकल्प - २ अंतर्गत अर्जापूर या गावातील पाणीपुरवठा योजनेच्या भूमिगत विहीर व जलकुंभ बांधकामास प्रारंभ झाला़ काम युद्धपातळीवर सुरू असल्याने आॅक्टोबरअखेर गावाला शुद्ध पाणीपुरवठा होईल, असा अंदाज आहे़ दरम्यान, राज्यात राबविणाºया अद्ययावत सुधारित पाणीपुरवठा प्रकल्पासाठी जागतिक बँकेने पाच कोटींचे अर्थसहाय्य दिलेले आहे़

ठळक मुद्देबिलोली : जागतिक बँकेकडून ५ कोटींचे अर्थसहाय्य, आॅक्टोबरअखेर शुद्ध पाणीपुरवठा

राजेश गंगमवार।लोकमत न्यूज नेटवर्कबिलोली : राज्य शासनाच्या जलस्वराज्य प्रकल्प - २ अंतर्गत अर्जापूर या गावातील पाणीपुरवठा योजनेच्या भूमिगत विहीर व जलकुंभ बांधकामास प्रारंभ झाला़ काम युद्धपातळीवर सुरू असल्याने आॅक्टोबरअखेर गावाला शुद्ध पाणीपुरवठा होईल, असा अंदाज आहे़ दरम्यान, राज्यात राबविणाºया अद्ययावत सुधारित पाणीपुरवठा प्रकल्पासाठी जागतिक बँकेने पाच कोटींचे अर्थसहाय्य दिलेले आहे़राज्य शासनाने जलस्वराज्य-२ या योजनेत तालुक्यातील अर्जापूर व सगरोळीचा समावेश केला़ पाच व सात कोटी खर्च होणाºया योजनेअंतर्गत संपूर्ण नियंत्रण संगणक पद्धतीने होणार आहे़ ग्रामपंचायत कार्यालयात बसूनच नदीपात्रातील मोटार रिमोट कंट्रोलद्वारे बंद-चालू करता येणार आहे़ गावातील नळधारकांना मीटरद्वारे पाणी रिडींग घेतले जाणार आहे़ प्रतिलिटर एक पैसा याप्रमाणे नाममात्र दर आकारला जाईल़ भूमिगत विहिरीसाठी सौर सोलार यंत्रणा अवलंबल्याने वीजपुरवठा खंडित अथवा भारनियमनाची समस्या राहणार नाही़ त्याचप्रमाणे जलकुंभ भरल्याबरोबर संगणकावर सूचना मिळेल़ तसेच २४ तास शुद्ध फिल्टर पाण्याचा पुरवठा होईल़ संपूर्ण अद्ययावत जागतिक पातळीवर तपासणी केलेली आॅटोमॅटीक यंत्रणा अवलंबण्यात येणार आहे़ सोलार ऊर्जा पद्धतीने वीजपुरवठा असल्याने वीजबिलाचा आर्थिक भार ग्रा़ पं़ ला़ बसणार नाही़ प्रारंभी एक वर्ष चाचणी पद्धतीवर ठेकेदार यंत्रणा चालवतील तद्नंतर ग्रा़पंक़डे सोपवण्यात येईल़शैक्षणिक सुविधा असलेल्या याच अर्जापूरची ओळख विविध उपक्रम राबवित असल्याने चर्चेतील गाव आहे़ दोन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर येथे मसनजोगी समाजाची उपेक्षित महिला सरपंच झाली़संपूर्ण राज्यातून मसनजोगी या भटक्या समाजाची एकमेव महिला सरपंच झाल्याची नोंद शासनदरबारी झाली़ आता जलस्वराज्य-२ ही अद्ययावत पाणीपुरवठा योजना अर्जापूरला होत आहे़ पाच कोटी खर्च होत असलेल्या योजनेअंतर्गत माचनूरच्या मांजरा नदीपात्रात भूमिगत विहिरीचे काम त्यापाठोपाठ २ लाख लिटर क्षमता असलेल्या जलकुंभाचेही बांधकाम सुरू झाले़ आगामी आॅक्टोबरअखेर काम पूर्ण होईल, असा आशावाद व्यक्त केला जातो़