शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

रस्ते खोदणाऱ्यांना बसणार चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 00:59 IST

विविध प्राधिकरण, संस्था, कंपन्यांकडून रस्ते खोदण्यासाठी परवानगी घेतली जाते़ मात्र संबंधितांचे काम पूर्ण झाल्यानंतर खोदलेले रस्ते तसेच दिसतात़ याचा त्रास संबंधित भागातील रहिवाशांना भोगावा लागतो़ मात्र या प्रकारास आता आळा बसणार आहे़ राज्याच्या नगरविकास विभागाने महानगरपालिकांसह नगरपरिषदांना या परवानगीबाबत कार्यपद्धती अवलंबविण्यास सांगितले असून, रस्ते खोदण्याची, पुनर्बांधणी तसेच दुरुस्तीची परवानगी घेणा-याचे नाव, पत्त्यासह संपर्क क्रमांकाचा फलक कामाच्या ठिकाणी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत़

ठळक मुद्देनगरविकास विभागाचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : विविध प्राधिकरण, संस्था, कंपन्यांकडून रस्ते खोदण्यासाठी परवानगी घेतली जाते़ मात्र संबंधितांचे काम पूर्ण झाल्यानंतर खोदलेले रस्ते तसेच दिसतात़ याचा त्रास संबंधित भागातील रहिवाशांना भोगावा लागतो़ मात्र या प्रकारास आता आळा बसणार आहे़ राज्याच्या नगरविकास विभागाने महानगरपालिकांसह नगरपरिषदांना या परवानगीबाबत कार्यपद्धती अवलंबविण्यास सांगितले असून, रस्ते खोदण्याची, पुनर्बांधणी तसेच दुरुस्तीची परवानगी घेणा-याचे नाव, पत्त्यासह संपर्क क्रमांकाचा फलक कामाच्या ठिकाणी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत़स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अखत्यारित येणाºया रस्त्यांची देखभाल, दुरुस्ती तसेच सदर रस्ते सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थाची आहे़ मात्र रस्त्यावरील पाण्याचा निचरा होत नसल्याचे तसेच रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाल्याबाबतच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येतात़ या अनुषंगानेच रस्ते दुरुस्तीच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करुन रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी नगरविकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थाना नव्याने निर्देश दिले आहेत़ यानुसार रस्ते खोदण्यासाठी एखादी संस्था, कंपनी अथवा प्राधिकरणास परवानगी देताना काम करणाºया अभिदात्याचे नाव, पत्ता व संपर्कावरचा तपशील, खोदकामास दिलेल्या परवानगीची व्याप्ती, काम पूर्ण करण्याचा अंदाजित कालावधी, याबरोबराच कामानंतर कोठून कोठपर्यंत रस्ते पूर्ववत करण्याबाबत येतील़ याबाबतचा तपशील असलेला फलक कामाच्या ठिकाणी लावणे बंधनकारक करण्यास सांगण्यात आले आहे़नागरिकांना त्यांचे गाºहाणे, तक्रारी मांडण्यासाठी वर्षभरासाठीची सुविधा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थाची आहे़ त्यामुळे संकेतस्थळाबरोबरच नागरिकांना भ्रमणध्वनीद्वारे तक्रारी करता येतील़ या अनुषंगाने व्यवस्था उभारावी़ या तक्रारीच्या अनुषंगाने झालेल्या कार्यवाहीचा अंतिम अहवाल अथवा माहिती छायाचित्रासह तक्रार प्राप्त झाल्यापासून तीन आठवड्यांत तक्रारदारास मिळण्यासाठी संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात यावी, असे निर्देशही नगरविकास विभागाने दिले आहेत़मल्लनि:स्सारण वाहिन्या पुरेशा संरक्षणाशिवाय उघड्या ठेवू नयेत, वाहिन्या उघड्या असल्यास त्या नागरिकांच्या निदर्शनास याव्यात यासाठीची उपाययोजनाही संबंधित यंत्रणांनी करावी, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे़नादुरुस्त रस्ते आणि खड्ड्यांचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून ऐरणीवर आहे़ अनेकवेळा स्थानिक स्वराज्य संस्था याबाबतच टोलवाटोलवी करीत असल्याचे दिसते़ मात्र उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्य शासनाच्या नगरविकास विभागानेही हा प्रश्न अधिक गांभीर्याने घेतल्याचे दिसून येते़ त्यामुळेच या विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थाना नव्याने कार्यपद्धतीबाबतचे दिशानिर्देश दिले असून याची अंमलबजावणी झाल्यास शहरी भागातील रस्ते प्रश्नाबाबत काहीसा दिलासा मिळू शकतो़त्रैमासिक अहवाल सादर करण्याच्याही सूचनामहानगरपालिकेसह नगरपरिषद आणि नगरपंचायतींना रस्त्यावरील खड्ड्याबाबत व दुरुस्तीबाबत नगरविकास विभागाने नव्याने सूचना केल्या आहेत़ या सूचनांच्या अनुषंगाने संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या कार्यवाहीचा तसेच तक्रारींबाबतचा त्रैैमासिक अहवाल आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन यांना पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ स्थानिक स्वराज्य संस्थानी पाठविलेल्या या त्रैैमासिक अहवालाला एकत्रित करुन शासनाच्या वतीने उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे़ त्यामुळे नगरविकास विभागाने दिलेल्या निर्देशाचे पालन आता स्थानिक स्वराज्य संस्थाना करावे लागणार आहे़ या सूचनांचे पालन झाल्यास शहरी भागातील नागरिकांना रस्त्यासंबंधीच्या प्रश्नांवर दिलासा मिळेल़

टॅग्स :Nandedनांदेडroad transportरस्ते वाहतूक